शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

शहरावर पाणीकपातीचे संकट

By admin | Published: September 07, 2015 12:18 AM

पावसाची अवकृपा : गंगापूर धरण समूहात ५८ टक्के साठा

नाशिक : मान्सून आता परतीच्या वाटेवर असताना अद्यापही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात अवघा ५८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सप्टेंबर महिन्यात पावसाची अवकृपा झाल्यास नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून पाणीकपातीच्या संबंधी चाचपणी सुरू असून, आणखी पंधरा दिवस पाऊस न पडल्यास पाणीकपात अपरिहार्य असल्याचे मानले जात आहे. मात्र, सद्यस्थितीत पूर्वा नक्षत्रात थोड्या फार पर्जन्यवृष्टीचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविलेला असल्याने नाशिककरांना अजूनही मोठ्या पावसाची आस लागून आहे. नाशिक शहराला गंगापूर धरण समूहातून पाणीपुरवठा केला जातो. दि. ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ३७८० दलघफू (६७ टक्के), तर काश्यपी धरणात ८२८ दलघफू (४५ टक्के) आणि गौतमी-गोदावरी धरणात ७९५ दलघफू (४२) टक्के इतका पाणीसाठा आहे. गंगापूर धरणसमूहात एकूण ५४०३ दलघफू (५८ टक्के) पाणीसाठा असून, दारणा धरणात ३६७६ दलघफू (५१) टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ५ सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ९५ टक्के, तर धरण समुहात ८३ टक्के इतका पाणीसाठा होता, तर दारणा धरणात ९८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात आता घट होऊ लागली असून, त्यातच सिंहस्थ कुंभमेळा सुरू असल्याने गोदावरीला अधून मधून पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे. दोन वर्षांपूर्वी अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या महापौरपदाच्या काळात सुरुवातीला पाणीकपातीचे संकट येऊन ठेपले होते. त्यावेळी महापालिकेने एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला होता. या निर्णयाला नाशिककरांनी साथही दिली होती. नंतर पाऊस भरभरून बरसल्याने पाणीकपात मागे घेण्यात आली होती. विशेष म्हणजे शहराला हिवाळा आणि पावसाळ्यात एक वेळ पाणीपुरवठा करण्यासंदर्भातही नागरिकांकडून सूचना आल्या होत्या. यंदा जून-जुलैमध्ये पाऊस कोसळल्यानंतर आॅगस्टमध्ये पावसाने ओढ दिलेली आहे. आता सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची वेळ येऊन ठेपली असून, सप्टेंबरअखेर समाधानकारक पाऊस न पडल्यास शहरात पाणीकपात अपरिहार्य मानली जात आहे. महापालिका प्रशासन पाणीकपातीबाबत चाचपणी करत असून, गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० ते ८५ टक्क्यांवर जाऊन न पोहोचल्यास उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्चपासूनच टंचाईच्या झळा जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)