पिंपळगाव बसवंत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणाची पातळी खालावल्याने शहराला पाणीपुरवठा करणे अवघड झाल्याने पाणीटंचाईला सामना करावा लागणार आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून शहराला अनियमितपणे पाणीपुरवठा होत होता. मात्र धरणातील पाणी साठा संपत आल्याने शहरावर १९८८नंतर प्रथमच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातही पाणीकपात केली जाणार आहे. पावसाची प्रतीक्षा लागून असून, चांगला पाऊस होणे अपेक्षित आहे. (वार्ताहर)
पिंपळगाववर पाणीटंचाईचे संकट
By admin | Published: June 25, 2016 10:42 PM