नाशिक : मागील वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने पाण्याची कमतरता पडली नसली, तरी गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डीफाटा परिसरातील पाणीप्रश्न विस्कळीत झाल्याने नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. याबाबत प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांनी संबंधित अधिकाºयांना विचारणा केली असता अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सभापतींचा संताप अनावर झाला. येत्या चार दिवसांत संपूर्ण प्रभागाचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांना बरोबर घेत जनआंदोलन करणार असल्याचा इशारा सभापतींनी यावेळी दिला. मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने सिडकोसह परिसरात पाणीपुरवठा अद्याप सुरळीत असला, तरी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांच्या प्रभाग ३१ मधील प्रशांतनगर, अलकापुरी सोसायटी, कावेरी, नंदनवन सोसायटीसह वक्रतुंड हॉस्पिटल परिसरातील पाणीप्रश्न गंभीर बनला असून, यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वी मध्यरात्री पाणीपुरवठा होत असतानादेखील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत होते; परंतु मध्यरात्री होणाºया पाणीपुरवठ्यामुळे या भागातील नागरिकांची झोप होत नव्हती . याचा विचार करून मनपाने मध्यरात्री होणारा पाणीपुरवठा सकाळच्या सुमारास केला. तसेच यासाठी स्वतंत्र जलकुंभदेखील उभारला. असे असले तरी पाणीपुरवठा सकाळी झाल्यापासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिकला सभापतींच्याच प्रभागात पाणीप्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:55 AM
प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डीफाटा परिसरातील पाणीप्रश्न विस्कळीत
ठळक मुद्देचार दिवसांचा अल्टीमेटम अधिकाºयांकडून उडवाउडवीची उत्तरे