मनमाड : मनमाड - लासलगावदरम्यान रापली गावाजवळ लोहमार्गाच्या खालून मनमाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. रेल्वेचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच पाइपलाइन रेल्वे प्रशासनाच्या गलथानामुळे फुटली. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या मनमाड शहरासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले आहे. आवर्तनाचे हे पाणी पाटोदा येथील साठवणूक तलावात घेण्यात आले. अजूनही आवर्तन सुरू आहे. त्यामुळे उर्वरित पाणी वागदर्डी धरणात याच पाइपलाइनने घेतले जात असते.दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कामाला ८-१० दिवस लागणार असल्याने मनमाडकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.कातरणी ते वागदर्डीदरम्यान वरील पाइपलाइनमधून ग्रॅव्हिटीने पाणी धरणात येते; पण सध्या या पाइपलाइन दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर आणि युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आवर्तनाचे पाणी वागदर्डी धरणात घेणे शक्य होत नाही. रेल्वेच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच मुख्य जलवाहिनी फुटली. सध्या मनमाड शहराला पालखेड कालव्यातून नियमित पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे.या आवर्तनाद्वारे पाटोदा येथील नगरपालिकेचा साठवणूक तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यातही आला. आवर्तनाचे हे पाणी यात पाइपलाइनद्वारे वागदर्डी धरणात घेतले जाते. परंतु पाइपलाइनच नादुरुस्त असल्याने अधिकचे पाणी मनमाडकरांना मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात आणि ऐन उन्हाळ्यात मनमाडकरांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागू शकतात... अन्यथा पाणीटंचाईची धगदि. ८ मार्च रोजी नगरपालिकेने शहराच्या पाणी वितरणाच्या दिवसात २ ते ३ दिवसांनी वाढ केली. सध्या मनमाडला १५ दिवसांतून एकदा म्हणजे महिन्यातून फक्त दोन दिवस पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या वागदर्डी धरणात दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. दुरुस्तीचे काम वेगाने, पूर्ण क्षमतेने तातडीने करावे म्हणजे आवर्तनाचे पाणी थेट वागदर्डी धरणात घेणे सुलभ होईल. त्यामुळे पुढील काळात भर उन्हाळ्यात मनमाडकरांना किमान १४ ते १५ दिवसाआड तरी पाणीपुरवठा होईल, अन्यथा पाणीटंचाईचे चटके भविष्यात तीव्र होण्याची शक्यता आहे.
जलवाहिनी फुटल्याने मनमाडकरांवर पाणीसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 10:21 PM
मनमाड : मनमाड - लासलगावदरम्यान रापली गावाजवळ लोहमार्गाच्या खालून मनमाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. रेल्वेचे दुरुस्तीचे काम सुरू असताना हीच पाइपलाइन रेल्वे प्रशासनाच्या गलथानामुळे फुटली. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देरेल्वेचा गलथानपणा : दुरुस्तीचे काम हाती; टंचाईची नागरिकांना भीती