चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथे अधिकाऱ्यांनी हातात टिकाव, फावडे घेऊन गावकºयांसमवेत श्रमदान केल्याने पहिल्याच दिवशी दगडी बांध बांधण्यात आला. आणि वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, सरपंच सखूबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे, पानी फाउंडेशनचे अमोल नेमणार, हेमंत पाटील उपस्थित होते. राजदेरवाडी हे गाव डोंगरांच्या कुशीत असून, पावसाळ्यानंतर या गावात अनेक पर्यटक जाऊन तेथील निसर्गाचा आनंद घेत असतात. या गावाने मोठ्या प्रमाणात गावातील सुधारणा केल्याने राज्य शासनाने आदर्श गाव म्हणून राजदेरवाडीला परितोषिक देऊन गौरवले आहे. वॉटर कप स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. वॉटर कप स्पर्धा दि. ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत सुरु राहणार आहे. यावेळी उपसरपंच मनोज शिंदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. श्रमदानासाठी तुरुंग अधिकारी एकनाथ शिंदे, नंदराज जाधव, जगन जाधव, भाऊसाहेब शिंदे, निवृत्ती शिंदे, संदीप शिंदे, अशोक जाधव, अशोक जिजाबाई पवार, खंडू जाधव आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वॉटर कप स्पर्धेचा प्रारंभ चांदवड : श्रमदानाने राजदेरवाडीला दगडी बांध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:13 AM
चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथे अधिकाऱ्यांनी हातात टिकाव, फावडे घेऊन गावकºयांसमवेत श्रमदान केल्याने पहिल्याच दिवशी दगडी बांध बांधण्यात आला.
ठळक मुद्देराजदेरवाडी हे गाव डोंगरांच्या कुशीतआदर्श गाव म्हणून राजदेरवाडीला परितोषिक देऊन गौरवले