नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात साठा वाढला असून, आता विसर्गही सुरू झाल्याने पाणीकपात रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र, यासंदर्भात येत्या सोमवारी (दि. २) निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले आहे. पावसाने ओढ दिल्याने गंगापूर धरणात साठा कमी होत गेला. त्यामुळे महापालिकेला दीर्घ काळ पाणीसाठा टिकवण्यासाठी पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागला. आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन आठवडे पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र आयुक्तांनी धरणातील साठा पन्नास टक्के झाल्यानंतर कपात रद्द करू, असे नमूद केले होते. त्यानुसार आता जवळपास ८० टक्के साठा झाल्याने पाणीकपात रद्द करण्याची मागणी होत आहे. पुढील आठवड्यापासून पाणीकपात रद्द होणे जवळपास निश्चित झाले आहे.
नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय सोमवारी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 1:53 AM