घोटी : दारणा धरण समूहातून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी गुरूवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाण्याचा विसर्ग सुरू केला. गुरूवारी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी दारणा धरणाचे दोन दरवाजे उघडून तीन हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आले.दरम्यान पाणी मार्गात असलेल्या गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वपक्षियांनी विरोध दर्शविला होता.दारणा धरण सुमुहात येणाºया भाम, भावली आणि वाकी खापरी धरणातून तीन दिवसापूर्वी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.हे पाण्याचा दारणा धरणात साठा झाल्यानंतर हे पाणी दारणा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आले. गुरूवारी सकाळपासूनच या धरणावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सकाळी साडेनऊ वाजता प्रांताधिकारी राहुल पाटील,पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलक,शाखा अभियंता सुहास पाटील यांच्या उपस्थितीत धरणाचे दोन दरवाजे उघडून तीन हजार क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.त्यानंतर दुपारी अकरा वाजता हा विसर्ग वाढवून पाच हजार ६०० करण्यात आला.तर दुपारी बारा वाजता धरणाचे सहा ही दरवाजे उघडून देत दहा हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.------------------------------खंडित वीजपुरवठयामुळे शेतकरी आक्रमकदारणातून पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाने खबरदारी घेत कालव्यालगतच्या गावाचा वीजपुरवठा खंडित केला.यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून, हा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.
दारणातून जायकवाडीसाठी पाणी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 1:06 PM