शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाणीकपातीचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 1:45 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.महापालिकेची धोरणात्मक निर्णयासाठी तहकूब झालेली महासभा मंगळवारी (दि.२५) सकाळी होणार आहे. महापालिकेच्या महासभेत अनेक वादाचे विषय असले तरी शहरवासीयांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा विषय पाणी कपातीचा असणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पाणीसाठा कमी होत आहे. पाऊसदेखील लांबल्याने आता नाशिककरांच्या तोंंडचे पाणी पळाले आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणात सुमारे दीडशे दशलक्षघनफूट पाणी असले तरी धरणातून महापालिकेच्या जलविहिरीपर्यंत पाणी येण्यात खडकाचा अडथळा आहे. महापालिकेने याठिकाणी चर खोदण्याचे काम सुरू केले आहे. तथापि, हे काम वेळेत होईल किंवा नाही अशी शंका आहे, त्याचबरोबर दारणा धरणातून प्रदूषित पाणी बंद झाल्यानेदेखील महापालिकेची अडचण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या शनिवारी (दि.२२) महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाच्या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळीच पाणीकपातीच्या अनुषंघाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते.पाणीपुरवठा विभागाने एकवेळ पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. त्यानुसार ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो तेथे एकवेळ आणि एकवेळ पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात कपात करण्याचे नियोजन आहे.कपातीऐवजी हवा निर्जला दिनप्रशासनाच्या वतीने दोन पर्याय देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र कोरडा दिवस किंवा निर्जला दिन करण्यावर भर आहे. एका दिवसात पाणीकपात झाल्यास साडेचारशे दशलक्ष लिटर्स पाणी एकाच दिवसात वाचत असल्याने प्रशासनाच्या मतानुसार हाच प्रस्ताव योग्य आहे. मात्र, यापूर्वी एकदा कोरडा दिवस ठेवला की दुसºया दिवशी जलवाहिन्या कोरड्या असतात. त्या भरण्यासाठी वेळ जात असल्याने कोरडा दिवसाच्या दुसºया दिवशीदेखील नागरिकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याने अडचण निर्माण होते. त्यामुळे सहसा नगरसेवक त्यासाठी राजी होत नाही.कटू निर्णय लोकप्रतिनिधींच्या माथीमनपात पाणीकपातीचे अधिकार खरे तर प्रशासकीय असून, ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आयुक्तच घोषित करीत असतात. हा कटू निर्णय असल्याने लोकप्रतिनिधींच्या गळी मारण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgangapur damगंगापूर धरणwater shortageपाणीटंचाई