कसबेसुकेणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली असून, मौजे सुकेणे व कसबेसुकेणेत पुराचे पाणी शिरले आहे. दुपारनंतर पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत असून, बाणगंगाकाठच्या सात गावांचा संपर्क तुटला आहे.मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बाणगंगेला महापूर आला आहे. ओझर ते सुकेणेदरम्यान या नदीवर असलेले पाचही पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे शिलेदारवाडी, दात्याणे, काटवन, मौजे सुकेणे या गावांचा संपर्क तुटला आहे. दात्याणे-थेरगाव येथील शेतकऱ्यांचा मुख्य रस्ता असलेल्या काटवनातील बाणगंगेवरील फरशी पुराच्या पाण्याखाली गेल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील लहान मोठे ओहोळ, नाले ओसंडून वाहत आहे. नदीकाठालगत असलेल्या हॉटेल व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, उशिरापर्यंत बाणगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहत होती.रेल्वेच्या अंडरपास खाली पुराचे पाणी कसबेसुकेणे रेल्वेस्थानकाच्या बाजूला सुकेणे ते पिंपळस रस्त्यावर असलेले रेल्वे गेट बंद असून, बाणगंगा नदीजवळून अंडरपास तयार करण्यात आला आहे. या अंडरपासमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे हा रस्ताही बंद झाला आहे. वाहतूक ठप्पपूरपरिस्थितीमुळे कसबे व मौजे सुकेणेला जोडणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. ओझर-सुकेणे-पिंपळस, कोकणगाव-सुकेणे- चांदोरी, सुकेणे-सय्यद पिंप्री-नाशिक या रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्ग दिवसभर बंद होता. सोयाबीनचे नुकसानकसबेसुकेणे व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून, बाणगंगचे पाणी परिसरातील शेतीत घुसले आहे. यामुळे सोयाबीन, टमाटा आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
मौजे, कसबेसुकेणे परिसरात घरांमध्ये शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:26 PM
कसबेसुकेणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगेने धोक्याची पातळी गाठली असून, मौजे सुकेणे व कसबेसुकेणेत पुराचे पाणी शिरले आहे. दुपारनंतर पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत असून, बाणगंगाकाठच्या सात गावांचा संपर्क तुटला आहे.
ठळक मुद्देशिलेदारवाडी, दात्याणे, काटवन, मौजे सुकेणे या गावांचा संपर्क तुटला