घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणावर शेतकरी कृती समितीतर्फे पंचक्र ोशीतील शेतकऱ्यांच्यावतीने जलपूजन करण्यात आले. इतर धरणांच्या तुलनेत भौगोलिक दृष्टया उगमस्थान कमी असतांनाही मुकणे धरण उंचीवाढीनंतर यंदा प्रथमच शंभर टक्के भरले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील मुकणे, पाडळी देशमुख, जानोरी, नांदगांव बुद्रुक , गोंदे दुमाला, कु-हेगाव, बेलगांव कु-हे, नांदुरवैद्य, अस्वली स्टेशन या सर्व गावातील शेतक-यांच्या उपस्थितीत माजी सभापती कचरू शिंदे, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, मुकणेचे सरपंच हिरामण राव, जानोरीचे सरपंच अर्जुन भोर, भाऊसाहेब धोंगडे आदींच्या हस्ते धरणात नारळ सोडून जलपूजन करण्यात आले. यावेळी अॅड. चंद्रसेन रोकडे, अॅड. भाऊसाहेब भोर, पाडळीचे सरपंच खंडेराव धांडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुखदेव दिवटे, नामदेव धोंगडे, संपत मुसळे, तुकाराम वारघडे, पाडळीचे उपसरपंच बाळासाहेब आमले, बाळू यंदे, बाळु मुसळे, शिवाजी गुळवे, ज्ञानेश्वर राव, गजीराम राव आदींसह मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातील जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 3:26 PM
शंभर टक्के भरले : शेतकरी कृती समितीची धरणावरच बैठक
ठळक मुद्देधरणात नारळ सोडून जलपूजन करण्यात आले