साकोरा : गेल्या तीन मिहन्यांपासून नांदगाव-साकोरा रस्त्यावर मोरखडी बंधार्याचे पाणी वाहत असल्याने वाहनचालक हैराण झाले होते.दुरु स्ती संदर्भात दोन शासकीय विभागांची टोलवाटोलवीची बातमी दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच तीसर्याच दिवशी संबंधित विभागाने बंधार्याच्या कडेने जेसीबी ने पाण्याला मोकळी वाट करून दिली.त्यामुळे रस्ता सुद्धा मोकळा झाल्याने वाहनचालकांनी लोकमतचे आभार मानले आहे.यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, यावर्षी चांगल्याप्रकारे पाऊस झाल्याने अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली त्यात नांदगाव- साकोरा हा नेहमीच वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ चालू असते यावर्षी संबंधीत विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर पायी चालणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर शिवमळा शिवारातील मोरखडी मातीनाला बंधारा यावर्षी पाण्याने चांगलाच भरल्याने त्याचे पाणी या रस्त्यावर गेल्या तीन मिहन्यांपासून वाहत असल्यामुळे रस्त्यावर वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती.दुरूस्तीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभाग यांनी संपूर्ण दुर्लक्ष केल्याची बातमी व फोटो दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच तीसर्याच दिवशी दोन्ही शासकीय विभागांच्या अधिकार्यांना जाग आली आण ित्विरत बंधार्याच्या पोटाला आण िरस्त्याचे कडेने जेसीबी ने पोटचारी केल्याने पाण्यालाअण िवाहनचालकांना रस्ता मोकळा करून दिला आहे.त्यामुळे लोकमतला छापून आलेल्या बातमीमुळे च रस्ता मोकळा झाल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.त्यामुळे नागरिकांनी व वाहनचालकांनी लोकमतचे आभार मानले आहे.फोटो १२ साकोरा, १२ साकोरा १)1) बातमी अगोदरचा फोटो2) बातमी छापून आल्यानंतर झालेली रस्तादुरु स्ती.
साकोरा रस्त्यावर वाहणारे पाणी झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 5:45 PM
साकोरा : गेल्या तीन मिहन्यांपासून नांदगाव-साकोरा रस्त्यावर मोरखडी बंधार्याचे पाणी वाहत असल्याने वाहनचालक हैराण झाले होते.
ठळक मुद्देलोकमत वृत्ताची दखल