त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव या पाणी टंचाईने त्रस्त गावाच्या पाणी प्रकल्पाचे डॉ.संजीवनी पवार यांच्या हस्ते अमृतकुंभ या नावाने टाकीचे नामकरण होऊन लोकार्पण करण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमने टँकर मुक्त केलेले हे १४ वे गाव आहे. या पाणी प्रकल्पाला लागणारा संपूर्ण निधी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ कै. आप्पासाहेब पवार यांच्या कुटुंबीयांनी उपलब्ध करु न दिला.यावेळी डॉ.अभिमन्यू पवार, रतनलाल भंडारी यांच्या हस्ते टाकीचे पूजन करण्यात आले. तसेच एका वितरण स्थानावरील नळांवर हंड्यात पाणी सुरु करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च श्रीलेखा पाटील, डॉ. प्रतीक्षा सिदीड, प्रणोती कवडे, डॉ. प्रविणा पवार, डॉ.समीर पवार यांनी केला.याप्रसंगी अप्पासाहेबांच्या पत्नी डॉ. संजीवनी यांनी मनोगत व्यक्त केले.सापगावला पाणी आल्याने गावातील अनेक समस्या सुटणार आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांनी गाव हागणदारी मुक्त करणे आणि पावसाळ्यात जास्तीत जास्त रोपं लावून वृक्ष संवर्धन करावे असे आवाहन फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केले.प्रकल्प यशस्वीतेसाठी प्रमोद गायकवाड, प्रशांत बच्छाव, डॉ. पंकज भदाणे, रामदास शिंदे, संदीप डगळे, दादा दिवे, उषा बेंडकुळी, मच्छींद्र कांबळे, बबन दिवे, काळू दिवे, ग्रामसेविका सारिका जगताप यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्र माला डॉ. वसंत कवडे, डॉ. नंदिनी पवार, अविनाश गुंजाळ, सहर्ष जोशी, समिर भादुरे, अभिजीत थोरात, प्रदिप बात्रा, सतिष दाणी, डॉ. आशुतोष भट, संदिप निमसे, राहूल कदम, प्रा. आशिष चौरसीया, प्रा.जोशी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.इन्फो.....सापगावाचे दरवर्षी पाण्यासाठी खूप हाल व्हायचे. सोशल फोरमच्या या प्रकल्पामुळे आमची पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटल्यामुळे आम्ही सर्व अतिशय आनंदात व समाधानी आहोत.- भारती दिवे, सरपंच, सापगाव.चौकट.......सापगावचा प्रश्न असा सोडवला.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव हे गाव नाशिकपासून अवघ्या ३० किलोमीटरवर आहे. पण गेली अनेक वर्षे प्रत्येक उन्हाळा या गावासाठी जीवघेणा ठरायचा. गावाजवळील दोनही विहिरी जानेवारीनंतर कोरड्या पडल्या कि गावकऱ्यांचे पाणी मिळवण्यासाठी प्रचंड हाल होत असत. एकतर अडीच किलोमीटरवरील नाल्यातून रात्री अपरात्री डोक्यावर पाणी आणणे किंवा टँकरवर अवलंबून राहणे हे दोनच पर्याय. अशा वेळी गावकºयांना सोशल नेटवर्किंग फोरमच्या टँकर मुक्ती अभियानाची माहिती मिळाली आणि त्यांनी फोरमकडे संपर्क साधला. फोरमच्या टीमने गावाची पाहणी केली आणि लक्षात आले कि अडीच किलोमीटरवरील नाल्याला वर्षभर पाणी असते. त्यावर विहीर खोदून पाइपलाइनने गावात पाणी आणले कि कायमस्वरूपी समस्या सुटू शकते. त्याप्रमाणे गावकºयांवर श्रमदानातून विहीर खोदण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. फोरमने पाईपलाईन, मोटार, गावातील टाकीची डागडुजीची जबाबदारी घेतली. आश्चर्य म्हणजे केवळ ८ फुटांवर भरपूर पाणी लागले. तिथून गावात पाणी लिफ्ट करून गावातील विवीध भागात वितरीत करण्यात आले.(फोटो २३ सापगाव)
सापगावची पाणी टंचाई मिटली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 7:39 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव या पाणी टंचाईने त्रस्त गावाच्या पाणी प्रकल्पाचे डॉ.संजीवनी पवार यांच्या हस्ते अमृतकुंभ या नावाने टाकीचे नामकरण होऊन लोकार्पण करण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमने टँकर मुक्त केलेले हे १४ वे गाव आहे. या पाणी प्रकल्पाला लागणारा संपूर्ण निधी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ कै. आप्पासाहेब पवार यांच्या कुटुंबीयांनी उपलब्ध करु न दिला.
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : सोशल नेटवर्कींग फोरम जलाभियानचा उपक्रम ; प्रकल्पाचे लोकार्पण