नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसाविणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून शुक्रवारी पाणी सोडण्यात येणार आहे. यंदा नोव्हेंबरमध्येच आवर्तन सोडावे लागत असल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर झाल्याचे मानले जात आहे.यंदा कमी पाऊस झाला असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७५ टॅँकरद्वारे सुमारे तीनशे गाव, वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. कमी पर्जन्यमानाचा सर्वाधिक फटका बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याला बसला आहे. चणकापूर धरणातून चारशे दशलक्ष घनफूट पाणी शुक्रवारी सोडण्यात येणार आहे. चणकापूरमधून सटाणा येथील आरम नदीपर्यंत पाणी येईल व तेथून कालवामार्गे ते मालेगाव येथील तळवाडे साठवण तलावापर्यंत पोहोचणार आहे.
सटाणा, मालेगावसाठी चणकापूरमधून सोडणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:48 AM