खामखेडा : परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने सुळे डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खामखेडा परिसरातील शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणामुळे बेभरोशाचा झाला असून, सध्याच्या प्रचंड उकाड्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचन व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे.गावाच्या उत्तर बाजूला मोठ्या प्रमाणात पर्वतरांगा आहेत. त्यांच्या पायथ्याशी संपूर्ण शेती आहे. त्यामुळे या परिसरातील शेती ही पावसाळ्यात डोंगरांवर पडणाºया पाण्यावर अवलंबून आहे. या डोंगरांवर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. परंतु हे पावसाचे पडणारे पाणी डोंगरावरून अडविण्यासाठी डोंगराच्या दºयांमध्ये मोठे नालाबांध नसल्याने हे पाणी थेट नदीतून वाहून जाते. चालू वर्षी जरी चांगला प्रमाणात पाऊस झाला असला तरी, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी मोठे धरण किंवा पूर्वीच्या नालाबल्डिंग आज अस्तिवात नसल्याने पाणी साठवून ठेवता आलेले नाही.
विहिरींच्या पाण्याची पातळी घटली चाराप्रश्न गंभीर : सुळे कालव्यास पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:27 PM