येवला : पूरपाणी शेतशिवारात येवला : पालखेड डाव्या कालव्यातून येवला तालुक्यात पिण्याच्या हेतूसाठी देत असलेले पूरपाणी संपूर्ण तालुक्याला मिळावे, अशी आग्रही मागणी व अधिकाऱ्यांशी शिष्टाई करीत शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी देशमानेसह लगतच्या सहा ते सात गावांना वितरिकेतून पाणी देण्याची गळ अधिकाऱ्यांना घातली आणि पाचोरा व शेळकेवाडी शिवारात असलेली वितरिका क्र मांक २५ चे गेट उघडून परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांना शुक्र वारी पाणी सोडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.येवला तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पूरपाणी सोडले आहे. हे गेट उघडल्याने देशमाने आणि मानोरी परिसरातील बंधारे या पाण्याने भरले जाणार असून, वाहेगाव, गोंदेगाव, मरळगोई परिसरात पूरपाणी फिरणार असल्याने शेतशिवारातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. शिवसेना नेते संभाजीराजे पवार, शरद लहरे, सचिन कासलीवाल, प्रवीण नाईक, मधुकर बोराळे, मनोज रंधे, दशरथ अहेर, उत्तम अहेर, बापू कांगणे, भागवत राठोड, भावराव डुंबरे, अण्णा जगताप, जालिंदर जाधव, प्रमोद भोसले, पोपट शेळके, सुधाकर तळेकर, पप्पू राठोड, दौलत औटी, राजेंद्र शेळके, गणेश शेळके, बाबूराव शेळके, उत्तम वावधाने, किरण जाधव, प्रभाकर वावधाने, शरद जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाचोरा व शेळकेवाडी शिवारात असलेल्या २५ क्रमांकाच्या वितरिकास्थळी जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. (वार्ताहर)
विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार
By admin | Published: September 02, 2016 9:59 PM