शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

पाणीबचतीचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:46 PM

पाणीबचतीचा मंत्र प्रत्येकालाच आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नसेल. आज पाणी वाचविले तर भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

पाणीबचतीचा मंत्र प्रत्येकालाच आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नसेल. आज पाणी वाचविले तर भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.  महापालिकेतून पाणीपुरवठा झालेले पाणी आपण फक्त पिण्यासाठी वापरले पाहिजे. आणि इतरांनाही तोच नियम लागू पडतो. नागरिकांनी आपली वाहने धुण्याऐवजी बादलीभर पाण्यात ती स्वच्छ पुसून काढली आणि फरशी आणि गाडी पुसलेले पाणी झाडांना टाकले तर बाराही महिने झाडे हिरवीगार राहतील. कित्येक गावांमध्ये जिथे टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा ठिकाणी स्त्रिया पाण्याचा जपून वापर करतात. पाण्याचा पुनर्वापर करतात. नाशिक परिसरात एवढी पाणीटंचाई जाणवत नाही; पण नाशिकमधील पावसाचे, गोदावरी नदीचे पाणी पुढे मराठवाड्यातील कित्येक गावांना पुरविले जाते. म्हणून आपण सर्वांनी पाणी वाचविणे आणि ते जपून वापरणे जरुरीचे आहे. नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात जमिनीतील पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. तेव्हा पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत कसे मुरविता येईल याकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात छतावर पडलेले पाणी थोडेसे टाळून जमिनीखाली बनविलेल्या टाकीत साठवून ठेवले तर अनेक वर्षं ते पाणी वापरता येईल. याला (रेन वॉटर हार्वेस्टिंग) पावसाचे पाणी साठविणे म्हणतात. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी शोषखड्ड्यात साठविले जाते आणि ते पाणी जमिनीत मुरते. बऱ्याच मोठ्या संस्था ही कामे करीत आहेत....हे करता येईल!प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक घरात पाणी वाचविले गेले तर पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. नाशिक हे औद्योगिक शहर आहे. नाशिकला बºयाच कंपन्या आहे. प्रत्येक कारखान्यामध्ये पाणी वापरले जाते. कारखाने, कचेºयातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी पाण्याचा योग्य वापर होतो आहे की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. पाणी हे जीवन आहे आणि त्याच्या शुद्धतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. त्यामुळे, पाणी दूषित होणार नाही यासाठी उपाययोजना महत्त्वाची आहे.नाशिकमध्ये जलतरण तलाव खूप आहेत. सरकारी आणि खासगी जलतरण तलावांना बरेच पाणी लागते. तेथेही पाण्याची बचत होऊ शकते. आजकाल जिकडे तिकडे शॉपिंग मॉल्स बघायला मिळतात. तिथेही पाण्याचा अपव्यय टाळता येईल. गाड्या धुण्यापेक्षा, घरातील फरशा, धुण्यापेक्षा त्या ओल्या कपड्याने पुसण्यावर भर द्यावा.

- डॉ. सुवर्णा तांबडे

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई