पांडाणे : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण व दिंडोरी तालुक्यातील सरहद्दीवरील गुलाबी रंगाची, गोड-आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. वाढत्या थंडीत लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरीला मागणीही असते. मात्र, नाशिकच्या आदिवासी पट्ट्यातील सुरगाणा, कळवण व दिंडोरी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवड केली असून, दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पिकावर केलेला खर्च निघेनासा झाला असून, बाजारपेठेऐवजी किरकोळ विक्र ी वेळ शेतकºयावर आल्याने ते हवालदिल झाले आहेत.जगभरातील स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वर बरोबरच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण तालुक्यातील घाटमाथ्यावर लालमातीत पिकणारी लालभडक, लहान मोठी, आंबट-गोड अशी स्ट्रॉबेरीची फळे वणी, सप्तशृंगगड व सापुतारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी दाखल झाली आहेत. रस्त्यावरून येणाºया जाणाºया भाविक व पर्यटकांना मोहीत करीत आहेत. वणी-सापुतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्र ीसाठी उपलब्ध झाली आहे.मात्र विक्र ीचा भाव कमी असल्यामुळे शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली. सुरगाणा तालुक्यातील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगाव, घागबारी, लिंगामा आदी भागात तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा आदी गावांतील आदिवासी शेतकरी शेतकरी भात, नागली, मका, भुईमूग, कुळीद, उडीद, दादर, गहू या पारंपरिक पिकांसह आता स्ट्रॉबेरीची बाग लावत आहेत. या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, जमिनीची पोत यामुळे याभागात सात आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागल्याने या भागात दिवसेंदिवस स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढत असल्याचे अशोक कवर यांनी सांगितले. मात्र, सद्यस्थितीत दर कोसळल्याने खर्चही सुटत नसल्याने उत्पादन कसे व कोणते घ्यावे, असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडल्याचे कवर यांनी सांगितले.चौकटखर्च व उत्पन्नाची आकडेवारीहेक्टरी उत्पादन : १५ ते २० क्विंटलउत्पादन खर्च : दीड ते २ लाखविक्र ी जागेवर : १२० ते १५० रु पये किलोबाजारभाव : साधारण ८० ते १२० रु पये किलोउत्पादन व विक्र ी खर्च : एकरी ३ ते ४ लाख रुपये
स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:16 PM