नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातला जाऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:38 AM2019-01-18T01:38:14+5:302019-01-18T01:38:43+5:30
नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
मनमाड : नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ या मनमाड येथे आलेल्या संपर्क यात्रेत ते बोलत होते.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सराकारच्या कारभारावर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते दिल्लीमधे नसल्याने शेतकºयांवर आत्महत्येची वेळ आली असल्याचे पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी झालेल्या सभेच्या व्यासपीठावर माजी मंत्री फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, पंकज भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, ओबीसी प्रदेशाध्यक्ष इश्वर बालबुद्धे, माजी खासदार समीर भुजबळ, रवींद्र पगार, श्रीराम शेटे, संजय चव्हाण, भारती पवार, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र पगारे, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवार व छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्टÑवादी कॉँग्रेसमधे प्रवेश केला. कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता राष्टÑवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी पक्षप्रवेश केला असल्याचे महाले यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन जयंत जाधव यांनी केले.
देशातील प्रश्नांवरच चर्चा
या निर्धार परिवर्तनाचा संपर्क यात्रेनिमित्त येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये विविध वक्त्यांची भाषणे झाली; मात्र या भाषणांमध्ये सर्वच नेत्यांनी स्थानिक वा राज्याच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची धोरणे यावरच टीकेची झोड उठविली. या सभेप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापूर्वीच्या भाषणांची व्हिडीओ क्लिप दाखवून त्यांचा खोटेपणा दाखवून दिला गेला.
शरद पवार यांना दिल्लीमधे ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी खंबीरपणे राष्टÑवादी कॉंग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.सध्या सरकारकडून रोज नवीन नवीन घोषणा करण्यात येत असून निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या घोषणा म्हणजे जनतेची शुध्द फसवणूक असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. कार्यक्रमाचे