गेल्या वर्षी यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत आमदार सरोज आहिरे यांनी पाहणी करुन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना भगदाड बुजविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कामही सुरु झाले होते. या कामासाठी मुरुम, माती टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र त्यानंतर अचानक काम बंद करण्यात आले. यंदाच्या पावसामुळे टाकलेली मातीही वाहून गेली व भगदाड पुन्हा अजूनही ‘जैसे थे’ आहे. या भादाडामुळे दारणा नदीवरील पुलाला धोका निर्माण झाला आहे. दारणा नदी पुलालगत विठोबा महिपती जगळे यांच्या मालकीच्या शेतीमध्ये गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पावसामुळे मातीचा भराव वाहून गेल्याने जमीन खचली होती. या भगदाड पासून १० ते १५ फुटाच्या अंतरावर महापारेषण कंपनीचा मोठा वीज वाहक टॉवर आहे. भुसभुशीतपणा यामुळे जमीन आणखी खचली तर या टॉवरला ही धोका पोहोचू शकतो. त्याचबरोबर पुलाला ही धोका पोहोचू शकतो. याबाबत ‘लोकमत’ ने वारंवार पाठपुरावा करत वृत्त प्रकाशित केले, मात्र वर्षभरात काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे ‘पाणी नेमके कुठे मुरते’ याची उलटसुलट चर्चा नागरिकांत सुरु आहे.
कोट===
जाखोरी गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला गेल्या वर्षी पावसाळ्यात भगदाड पडले होते. यंदाही पावसामुळे मुरुम वाहून गेल्याने भगदाड मोकळे झाले आहे. या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे पुलाला निर्माण झालेला धोका तत्काळ दूर करावा.
-मंगला युवराज जगळे, सरपंच, जाखोरी
(फोटो १३ पुल)