येवला तालुक्यातील आंबेगाव येथील रतन सोनवणे यासह आठ शेतकऱ्यांची शेती येवला-निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पाझर तलावाच्या लगत आहे. गेल्या तीस वर्षांपूर्वी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत दर पावसाळ्यात पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते पण पाझर तलावाला सांडवा नसल्याने पाण्याचा विसर्ग होत नाही. त्यामुळे गेल्या तीस वर्षांपासून आजपर्यंत दरवर्षी पावसाळ्यात शेतकरी रतन विठ्ठल सोनवणे गट, कुसूम रतन सोनवणे. दत्तात्रेय रतन सोनवणे, विजय रतन सोनवणे, मोहन रतन आव्हाड, जनार्दन सयाजी सोनवणे, बाबूराव रामजी सोनवणे, बाळू सोनवणे, कचरू सोनवणे यांच्या शेतातील मका, टोमॅटो, सोयाबीन, द्राक्ष यासह इतर पिकांचे मोठे नुकसान होत आले आहे. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न उभा राहत आहे. या पाझर तलावाला सांडवा नसल्याने संपूर्ण दहा एकर क्षेत्रात पाणी राहत असल्याने पिके खराब होत आहेत.
फोटो- ०८ आंबेगाव
080921\08nsk_36_08092021_13.jpg
फोटो- ०८ आंबेगाव