वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यालाही अखेर यश आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील पाणीटंचाईबाबत गेल्या ३ वर्षांपासून श्रमजीवी संघटनेने सतत आंदोलने, मोर्चे, निवेदन देऊन पाणीप्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले होते. प्रसारमाध्यमांनीदेखील या गावचा ग्राऊंड रिपोर्ट घेत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. लोकसभेच्या निवडणूक काळात राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणून याच वाडीचा पाणीटंचाईचा व्हिडीओ नाशिकच्या जाहीर सभेत दाखवला होता.याबाबत श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर याबाबतीत आमदार हिरामण खोसकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन पाणीप्रश्न सोडवावा म्हणून मागणी केली होती. त्यांनी तत्काळ या योजनेसाठी त्यांच्या विकास निधीमधून १५ लाख रुपये दिले आणि सोमवारी खोसकर यांच्याच हस्ते योजनेचे उद्घाटन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या लढ्याला मिळालेले यश असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान डोखे यांनी सांगितले.आमदार स्थानिक विकास निधीमधून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १५ लाख, तर डोंगरी विकास निधीमधून ९ लाख ४० हजार रुपये अंगणवाडी इमारतीसाठी दिले असून, या योजनेचे तत्काळ काम सुरू होणार असल्याची माहिती यावेळी आमदार खोसकर यांनी दिली.यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, गटविकास अधिकारी किरण जाधव, तानाजी शिद, वसंत इरते, वावीहर्षचे सरपंच बाबूराव बांगारे, ग्रामसेवक राठोड, मांगटे, संतोष निरगुडे, शिवाजी दराने, नवसू गारे, संजय पारधी, लीला पारधी, शंकर पारधी, गेणू पादिर, चिमाबाई शिद, सुरेश बांगारे, नामदेव बांगरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बरड्याची वाडी येथील पाणीटंचाईचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गाजला होता. यावेळी अनेक पक्षांनीदेखील या विषयाकडे गांभीर्याने घेण्याचे सुचवले होते आणि सोमवारी त्याचे उदघाटन झाल्याने खऱ्या अर्थाने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे.भगवान मधे, जिल्हा सरचिटणीस, श्रमजीवी संघटना
बरड्याची वाडीचा पाणीप्रश्न अखेर सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 6:25 PM
वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यालाही अखेर यश आले.
ठळक मुद्देवैतरणानगर : श्रमजीवी संघटनेच्या लढ्याला अखेर आले यश