नांदगाव : पाण्यासाठी लागतात रेशन दुकानांसारख्या रांगासंजीव धामणे ल्ल नांदगावपृष्ठभागावरचे पाणी दिवाळीतच आटले. आता पाण्याने विहिरींचा तळ गाठला असून, गावोगावी पाणी हापसणारी तरुणाई व रणरणत्या उन्हात कंबरेवर व डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन जाणाऱ्या महिला हे नांदगावच्या ग्रामीण भागातले चित्र आहे. नांदगाव व मनमाड शहरात १५ ते २० दिवसांनी पाणी येते. अशी पाणीटंचाईची स्थिती आहे. पूर्वी रेशन दुकानांमध्ये धान्यासाठी लागणाऱ्या रांगांप्रमाणे ग्रामीण भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी पाण्यासाठी रांगा लागत आहेत.
पाणीप्रश्न बिकट
By admin | Published: March 03, 2016 10:25 PM