नाशिक : मराठा व मुस्लिम समाजाला सरकार आरक्षणाचा निर्णय देत नाही तसेच चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने काल बुधवारी गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत आंदोलकांना अटकाव केल्यामुळे प्रयत्न हाणून पाडण्यात आला.बुधवारी दुपारी आंदोलकांनी एकत्र येत गोदावरी पात्रात उड्या मारल्या व ‘मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ ‘समाजात तेढ पसरविणाऱ्या शासनाचा निषेध असो’‘ सरकारचे करायचे काय खाली तंगडया वरती पाय’ आदी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष अजिज पठाण, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात रफीक साबीर, मुख्तार शेख, कय्यूम शेख, शेरुभाई मोमीन, निसार खाटीक, आवेश शेख, अन्सार शेख, रशीद शेख, अर्षद शेख, मोसीन शेख, इब्राहिम अत्तार, युसुब बाबा, संगीता वाघ, अलका चव्हाण, समीना पठान, इरफान शेख, कैलास नीळे, सलीम काजी, आक्का सोनवणे, भागाबाई मोरे, सिद्दीक अन्सारी, आदींचा आंदोलक सहभागी झालेले होते.