नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दातली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पानी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराचे सरपंच उज्ज्वला नागरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.गेल्या वर्षीपासून पानी फाउण्डेशनच्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे यंदाही नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या सिन्नर व चांदवड तालुक्यांत विद्यार्थी प्रशिक्षणावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील ७६ तालुक्यांत विद्यार्थी प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून, या उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून १४ शाळांची निवड करण्यात आल्याचे तालुका समन्वयक सुषमा मानकर यांनी सांगितले.दिवसाला एक तास याप्रमाणे प्रत्येक शाळेत चार तासांचे प्रशिक्षण सत्र घेतले जात आहे.यात निसर्गावरील मुलांचे प्रेम वाढावे, माणूस हा प्राणी कसा वागतो, झाडे तोडून निसर्गाची कशी हानी होत आहे अशा गोष्टी विद्यार्थ्यांना गाणी, खेळ व चित्रफितीच्या माध्यमातून समजावून सांगितले जात आहे. त्यासाठी तालुक्यात पानी फाउण्डेशनच्या प्रशिक्षक प्रियंका फाटक, विलास भालेराव, लक्ष्मण साखरे हे प्रशिक्षण देत आहेत. तालुक्यातील सोनांबे, धोंडबार शाळांमधील प्रशिक्षणानंतर दातली येथील शाळेत उपक्रमाला सुरुवात झाली असून, विद्यार्थी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे मानकर यांनी सांगितले.प्राचार्य एकनाथ भाबड यांनी स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पानी फाउण्डेशनतर्फे विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:27 AM
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दातली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पानी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराचे सरपंच उज्ज्वला नागरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ठळक मुद्देवॉटरकप स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण