येवला : पाण्याचा वापर कसा करावा स्वच्छतेचे फायदे व स्वच्छता पद्धती, डिजिटल साक्षरता, ओला व सुका कचर्याचे व्यवस्थापन, महिला सक्षिमकरण या विषयांवर कार्यशाळेतून महिलांक़्हे प्रबोधन करण्यात आले. नव्या दिशा आणि ग्रामीण कुटा यांच्यातर्फे सामाजिक जनजागृती मोहिमेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संदीप कोळी, विस्तार अधिकारी भाऊसाहेब अहिरे, स्वच्छता निरीक्षक घनश्याम उंबरे, भाग्यश्री लांडगे होते. नव्या दिशाचे विकास अधिकारी अर्जुन चौगुले, ग्रामीण कुटाचे विभागीय अधिकारी चंद्रशेखर वाराणसी, क्षेत्रिय अधिकारी योगेश जवंजाळ, शाखाधिकारी सचिन अंकुरणीकर, धीरज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी महिलांना महिला सशक्तीकरण, सायबर क्र ाईम, कौटुंबिक हिंसाचार याबाबत मार्गदर्शन केले. घनश्याम उंबर यांनी स्वच्छतेचे फायदे व स्वच्छता राखायचे पद्धती ओला व सुका कचर्याचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. भाग्यश्री लांडगे यांनी आरोग्य महिलांना होणारे व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले. इंद्रसिंग पाटील, चेतन बिलारे, विनोद जाधव, केशव चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
महिलांना कार्यशाळेतून पाणी बचतीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 3:53 PM