नाशिक : महापालिकेने शहरात गेल्या ३० जूनपासून केलेल्या पाणीकपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट पाणी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी ही कपात अवघी ५ टक्केच झाली होती. त्यातून गावठाण भागात दोन वेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करून असून, उच्चभ्रू भागात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नाही, असा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला आहे.गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही, त्यातच पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शहरावर पाणी संकट गहिरे होत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे महापालिकेने शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या चार विभागांत दोनवेळा पाणीपुरवठा होतो तेथे एकवेळ पाणीपुरवठा होईल. त्याचप्रमाणे दर गुरुवारी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या निर्णयाला पंधरा दिवस उलटत नाही तोच दर गुरुवारी कोरडा दिवस म्हणजेच ड्राय डे मागे घेऊन नियमितपणे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषत: गंगापूर धरणातील साठा ५४ टक्क्यांवर गेल्याने गेल्या सोमवारी (दि.१५) दर गुरुवारची पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. परंतु,ज्या भागांमध्ये दोनवेळ पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा कायम ठेवला आहे. तथापि, महापालिकेने पंधरा दिवसांत ७५ दशलक्षघनफूट पाणी वाचल्याचा दावा केला असला तरी बग्गा यांनी तो फोल ठरविला आहे. ३० जून ते १३ जुलै दरम्यान प्रशासनाने ५२५४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला आहे. महापलिकेने दररोजचा उपसा कायम ठेवला असता तर रोज ४६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा या हिशेबाने १४ दिवसात शहराला ६४४० दशलक्ष दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा करावा लागला असता.
कपातीमुळे अवघी ५ टक्केच पाणी बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:20 PM
महापालिकेने शहरात गेल्या ३० जूनपासून केलेल्या पाणीकपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट पाणी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी ही कपात अवघी ५ टक्केच झाली होती. त्यातून गावठाण भागात दोन वेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करून असून, उच्चभ्रू भागात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नाही, असा आरोप नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी केला आहे.
ठळक मुद्देबग्गा यांचा दावा : गावठाणाला वेठीस धरले