माळवाडी : पूर्णवर्षभरात शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही तर दुसरीकडे यंदा सर्वसाधारण पाऊस झाल्याने भीषण दुष्काळामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. गिरणा काठावरील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.तालुक्यांमधील पाणीपुरवठा योजना ठप्प होऊन गेल्या आहेत. यात देवळ्याच्या पूर्व भागात गेल्या महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्याने, पुनद व चणकापूरचे आरक्षित पाणी गावांमध्ये होत असणारी पाणी टंचाई व रब्बी पिकांची गरज लक्षात घेता गिरणा नदीपात्रात सोडावे, अशी मागणी कसमादे तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.या वर्षीची दुष्काळाची दाहकता १९७२ सालापेक्षा जास्त असल्याचे जुन्या जाणकारांकडून बोलले जात आहे. विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे. खरीप हंगाम अल्पशा पावसाने सुकून गेले, आता थोड्याफार उपश्याच्या पाण्यावर रब्बी व उन्हाळी कांद्यासाठी पाण्याची भीषण समस्या उदभवू लागली आहे. जर यात गिरणा नदीला पाणी सोडले नाही, तर उन्हाळी कांद्यासह रब्बी हंगामातील पीकही खरीपच्या पिकांसारखी जळुन खाक होतील, अशी भीती आता शेतकºयांना सतावत आहे.- नऊ गांव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत काही गावांना जास्तीत जास्त अर्धा तास पाणी मिळत आहे, तर काहींना गेल्या मिहन्याभरापासून पाण्याचा थेंबही मिळाला नसल्याने आता आवर्तन सोडणे गरजेचे आहे.- शिवाजी बागुल, सरपंच, माळवाडी.- अपुºया पावसामुळे व शेतीविषयक कुचकामी धोरणांमुळे शेती व्यवसाय संकटात आला आहे, त्यात आज रब्बी हंगाम व उन्हाळ कांदा पीक वाचवण्यासाठी पाण्याची तीव्र गरज आहे.-संदीप शेवाळे, शेतकरी, लोहणेर. (२१ चणकापूर डॅम)
कमसा पट्यात पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 5:55 PM
माळवाडी : पूर्णवर्षभरात शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही तर दुसरीकडे यंदा सर्वसाधारण पाऊस झाल्याने भीषण दुष्काळामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. गिरणा काठावरील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
ठळक मुद्देगिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी