येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यात पाणी मागणार्या गावांची वाढ होवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील आठ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून या गावांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीत दाखल झालेले आहेत.तालुक्यातील अनकाई, वसंतनगर, ममदापूर, शिवाजीनगर, भुलेगाव, चांदगाव, कुसमडी, आहेरवाडी या गावांचा पाणी टंचाईचा पुर्वानुभव पाहता यंदा पंचायत समितीच्या वतीने गेल्या चार महिन्यात उद्भव असणार्या ठिकाणावरील हातपंप दुरूस्तीची विशेष मोहीम राबविण्यता आली होती. त्यामुळे जानेवारी-फेबुवारीपासूनच पाणी मागणार्या गावांना यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाई जाणवू लागल्याचे सभापती प्रविण गायकवाड यांनी सांगीतले.पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीने पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केलेला असून आराखड्यातील एप्रिल ते जून या तिसर्या टप्प्यात संभाव्य पाणी टंचाई जाणवणार्या ५२ गावे, ३६ वाड्यांवर विंधन विहीर घेणे, विहिर खोल करणे, खाजगी विहिर अधिग्रहण करणे, टँकरने पाणी पुरवठा करणे आदी उपाय योजनेचे नियोजन करण्यात आल्याचेही सभापती गायकवाड यांनी सांगीतले.
येवला तालुक्यात ८ गावांना पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 10:17 PM
येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यात पाणी मागणार्या गावांची वाढ होवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील आठ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून या गावांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीत दाखल झालेले आहेत.
ठळक मुद्देपाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार