त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाड्या-पाड्यांमधील विहिरींनी तळ गाठला असून डोंगराच्या कुशीतील झरे-नाले आटल्याने पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. पाणीटंचाईमुळे प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे. त्यामुळे अधिकारीवर्ग रात्रीही दौरे करत आहेत. पावसाळा सुरू व्हायला अद्याप दीड महिना बाकी असताना पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.२) प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसिलदार दिपक गिरासे व जैन फाऊण्डेशनचे नंदलाल साखला यांची यंबक पंचायत समिती कार्यालयात बैठक झाली. मेटघेरा या ग्रामपंचायतीच्या महादरवाजा, गंगाद्वार, सुपलीची मेट, पठारवाडी, जांभुळवाडी, जांबाची मेट आदी ठिकाणी पाणीच पोहचत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. या ठिकाणी जैन फाउंडेशन व लोक श्रमदानातुन येत्या ४ ते ५ दिवसात पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. नगरपालिकेच्या बांधलेल्या टाकीत पाणी साठा होत असतो. तेथुन सिंगल फेजने पाणी वरती नेउन सर्वांना पाणी पुरवठा करण्यात येईल. यातील पाईपलाईनचे काम श्रमदानातुन करण्यात येईल. तर पाईपलाईन मोटार वगैरे खर्च भारतीय जैन संघटनेचे नंदलाल साखला, गोटु चोरडीया यांच्या पुढाकाराने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.बरड्याच्या वाडीला पोहोचले पाणीदरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील टंचाई संदर्भात दोन प्रकारे उपाययोजना तहसिलदार दिपक गिरासे यांनी केल्या आहेत. त्यानुसार गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टँकर द्वारे पाणी टाकण्यात आलेतर टँकर गावातील टाक्यांपर्यंत पोहोचत नसल्याने टँकर मधील पाणी डिझेल इंजिन द्वारे टाक्यांमध्ये भरण्यात आले. याशिवाय, कायमस्वरु पी उपाययोजनांमध्ये वैतरणा धरणातून वावीहर्ष ते दुगारवाडीपर्यंत पुर्वी पाईप लाईन गेलेली आहे. त्या पाईपलाईनला वावीहर्ष ते बरड्याची वाडी यादरम्यान असणारी जुनी पाईप लाईन दुरु स्त व जोडणी केल्याने गावातील टाक्यांपर्यंत पाणी नेल्याने ग्रामस्थांना गावातच मुबलक पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बर्ड्याच्या वाडीची पाणी समस्या मिटली असल्याचे तहसिलदारांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाड्या-पाड्यांमध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 5:03 PM
उपाययोजना : जैन फाऊण्डेशनचा पुढाकार
ठळक मुद्देमेटघेरा या ग्रामपंचायतीच्या महादरवाजा, गंगाद्वार, सुपलीची मेट, पठारवाडी, जांभुळवाडी, जांबाची मेट आदी ठिकाणी पाणीच पोहचत नसल्याने चिंता व्यक्त