ंयेवला : पाण्यासाठी भटकंती करण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात टँकरग्रस्त गावांची संख्या वाढतच असून, ३७ गावे आणि ३२ वाड्यांना १९ टँकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.येवला तालुक्यात केवळ ४३३ मि.मी. पाऊस झाला. अल्पपर्जन्य-मानामुळे गेल्या जानेवारीतच ग्रामीण भागातील सर्व जलाशये कोरडेठाक झाले असून, सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे. येवला शहरालगत असलेले ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात फेब्रुवारीअखेर केवळ चार दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. हा साठवण तलावदेखील तळ गाठण्याच्या स्थितीत आहे. सध्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून ४५ गावांची तहान भागवली जात आहे. ७९.२० दक्षलक्ष घनफूट पाणी आरक्षण या योजनेसाठी असले तरी जानेवारीमध्ये मागणीप्रमाणे पालखेड विभागाने साठवण तलाव भरून दिला नाही. त्यामुळे हा पाणीसाठा मार्चअखेर पुरवण्याचे आव्हान आहे.तालुक्यात ३८ गाव नळपुरवठा योजनेमुळे ज्या गावांना पाणीपुरवठा सुरू आहे त्या गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. या नळ योजनेच्या अंमलबजावणीतही सद्यस्थितीत कुठल्याही त्रुटी दिसत नाही. सद्यस्थितीत तालुक्यातील ३७ गावे व ३२ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कुसुमाडी, वाईबोथी, सायगाव, बाळापूर, पांजरवाडी, बोकटे, दुगलगाव, अहेरवाडी, लहित, जायदरे, मुरमी, आडगाव रेपाळ, धामणगाव, खिर्डीसाठे, देवळाणे, खरवंडी, देवदरी, कोटमगाव खु।।, तांदूळवाडी, खैरगव्हाण, महालगाव, हडप सावरगाव, चिचोंडी बु।।, बल्हेगाव, रायते या २६ गावांसह महादेववाडी, चांदरजठार वस्ती, रानमळा, सायगाव फाटा, गोपाळवाडी, हनुमाननगर, गोल्हेवाडी रोड वस्ती, घनामाळी मळा, वडाचा मळा, कुडके सानप वस्ती, माळवाडी, गाडेकर वस्ती, हनुमाननगर (खिर्डीसाठे), राजापूरमधील वाघ वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथ वस्ती, सानप वस्ती, महानुभाव वस्ती, अंदरसूलमधील योगेश्वरवाडी, शंकरवाडी, फुलेवाडी, सावतावाडी, जयहिंदवाडी, दळे वस्ती, रामवाडी, बजरंगवाडी, देशमुखवाडी, या वस्त्यांवर १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.दरम्यान, धनकवाडी, कासारखेडे, गोपाळवाडी, वडगाव, ममदापूर, मातुलठाण, कातोरे वस्ती, कोटमगाव बु।।, बदापूर, चिचोंडी खु।।, सातारे ही ११ गावे व ममदापूर परिसरातील १३ वाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले असून, या गावांना जादा चार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पंचायत समिती सूत्रांनी दिली.गाव पाहणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवलेले प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत काही गावे आहेत़ रेंडाळे, न्याहारखेडे, पिंपळखुटे, तिसरे, पिंपळखुटे बु।।, नागडे, भारम, रहाडी, वाघाळे, मानोरी बु।।, खडकीमाळ, आडसुरेगाव या अकरा गावांसह भारम परिसरातील जेजूरकर वस्ती, आड सुरेगाव वस्ती, बोकटे वस्ती या तीन वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार शरद मंडलिक, सुनील आहिरे यांनी दोन दिवस पाहणी केली. या गावांना टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहेत. प्रस्ताव मंजूर होताच संबंधित गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. घुलेगाव व उंदीरवाडी, धुळगावसह १० वाड्यांचे पाणीटंचाईसंदर्भात नवीन टँकर मंजुरीचे आदेश मिळावे यासाठी तहसीलदारांकडे मागणी आलेली आहे. सध्या तालुक्यात असणारे डोंगरगाव, खिर्डीसाठे, सावरगाव येथे तीन लघु पाटबंधारे तलाव आहेत. परंतु ते पूर्णत: कोरडेठाक आहे. सध्या पाणीटंचाई असलेल्या गावांची मागणी आल्यानंतर महसूल व पंचायत समिती यांची संयुक्त पाहणी त्यानंतर प्रांताधिकारी द्वारा जिल्हाधिकाऱ्यांकडे टँकर मंजुरीचा प्रस्ताव पाठविला जातो. यात किमान १२ ते १५ दिवसांचा कालावधी निघून जातो. टंचाईग्रस्त गावातील टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणी होत आहे. यामुळे पाणी टँकर मंजुरीसह टंचाईग्रस्त गावांना तत्काळ पाणी देण्याची व्यवस्था करता येईल. दररोज टँकरची एकच फेरी गावात होत असून, जनावरांनाही यातूनच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र हा पाणीपुरवठा अपुरा ठरणार असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा उपलब्ध नाही. शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न, शेतात वस्ती करून राहणाऱ्या व वस्ती म्हणून अधिकृत मान्यता नसलेल्या वस्त्यांना, शासनस्तरावरून पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे या शेतकऱ्यांना पाणी पातळी खोल गेलेल्या विहिरी व जागोजागी ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्व्हची गळतीद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. यासाठी १ ते २ किमी अंतरावरूनही पाणी आणावे लागते़ (वार्ताहर)
येवल्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर
By admin | Published: March 14, 2016 10:43 PM