नाशिक : गंगापूर धरणात ८० टक्के साठा होताच महापालिकेने तातडीने पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली असून, मंगळवारपासून (दि.३०) त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे गावठाण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.गंगापूर धरणातील पातळी खालावल्याने आणि पावसानेदेखील ओढ दिल्याने शहरावर जलसंकट कोसळले होते. त्यामुळे गेल्या ३० जूनपासून शहरातील ज्या भागात पाणी दोन वेळा पाणीपुरवठा होतो अशा भागात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला, तर दर गुरुवारी संपूर्ण शहरातच पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.शहराला पाच धरणांमधून पाणीपुरवठा होत असला तरी महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या घोळामुळे गौतमी गोदावरी आणि कश्यपी धरणात दीडशे लक्षघनफूट पाणी असूनही त्याचा उपसा करणे शक्य झाले नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार महापालिकेने केला आणि धरणातील पाणी कमी झाल्यावर चर काढण्याचे काम सुरू केले, परंतु नंतर पाऊस सुरू झाल्याने हे काम करता आले नाही. त्यामुळे दारणात दीडशे, तर गंगापूर धरण समूहात दीडशे असे तीनशे दशलक्षघनफूट पाणी असूनही नाशिककरांवर पाणीकपातीला सामोरे जाण्याची नामुष्की आली होती. महापालिकेच्या पाणीकपातीमुळे गावठाण भागात ज्या ठिकाणी उंच सखल भाग आहे. तेथे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पंचवटी व नदीकाठच्या भागात प्रथमच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. उपनगर, पाथर्डी फाटा याठिकाणीही पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.अवघी पाच टक्केचहोती कपातमहापालिकेच्या वतीने पाणीकपात रद्द करण्यात आली आणि त्याचा गाजावाजा खूप झाला असला तरी प्रत्यक्षात संपूर्ण शहरात पाच टक्केच पाणीकपात झाली होती आणि गावठाण भागाला त्याचा सर्वाधिक फटका बसला होता. शहरातील ज्या भागात एकवेळ पाणीपुरवठा होतो तेथे मनपाने कोणत्याही प्रकारची कपात केली नव्हती.
धरणातील साठा वाढल्याने पाणीकपात अखेरीस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 1:34 AM