चांदवड : शहरातील वरचेगावात प्रभाग क्रमांक तीन, नऊ व दहामधील लोहार गल्ली, हत्तीखाना, ब्राम्हण गल्ली, पाटणी गल्ली, डांबरविहीर परिसर, पंचशीलनगर, बागवानपुरा, देवी रोड, शिंपी गल्ली, हनुमाननगर, बोरसे गल्ली, रंगमहाल परिसर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्वरित याबाबत दखल घ्यावी असे निवेदन नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित कदम यांची भेट घेऊन नागरिकांनी निवेदन दिले.
वरचे गावातील पाण्याचे स्रोत कमी असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या कोरोना महामारीत हातपंपावर महिलांना पाणी भरण्यासाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण तातडीने उपाययोजना करून वरचेगावातील पाणीपुरवठा चार-पाच दिवसांवर करावा. या उपरही काही उपाययोजना केल्या नाही तर शिवसेना व वरचे गावातील सर्व नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. निवेदनावर शिवसेना उप-शहरप्रमुख सचिन खैरनार, अॅड. विशाल व्यवहारे, गणेश जगताप, रूपेश अजमेरा, गणोश लहरे, गणोश खैरनार, सागर बर्वे, भूषण कोकंदे, राजेंद्र आहेर, संजय जाधव, संदीप पवार, योगेश बोरसे, राजा सोमवंशी आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत.
----------------------------------------------------------------------
चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना पाणीटंचाईचे निवेदन देताना गुड्ड खैरनार, गणेश खैरनार, गणेश जगताप, भुषण कोंकदे, रूपेश अजमेरा व नागरिक. (२८ चांदवड १)
===Photopath===
280521\28nsk_35_28052021_13.jpg
===Caption===
२८ चांदवड १