परिसरात होणाऱ्या कमी पाणीपुरवठ्याबाबत रहिवासीयांनी अनेकदा म्हाडाकडे तक्रार केली आहे. मात्र म्हाडा प्रशासन पाणी प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कुठलीच उपाययोजना करीत नाही, असा आरोप नागरिकांनी करत म्हाडाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. पाणीपुरवठा कमी व सुरळीत होत नाही त्यामुळे खाजगी पाण्याचे टँकर मागवून टाकीत पाणी भरावे लागत आहे.
४४८ घरांच्या प्रकल्पात सध्या साडेतीनशे ते चारशे सदनिकाधारकांनी ताबा घेतला आहे. आणखी इतर सदस्यांनी ताबा घेतला नसला तरी पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सदनिकाधारकांनी ताबा घेतल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने म्हाडाने पाणीपुरवठा विभागाच्या मदतीने पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरी भागात वास्तव्यास असूनही खेडेगावचा अनुभव घ्यावा लागत आहे. म्हाडा प्रशासनाने वेळीच पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर आगामी काळात म्हाडा इमारतीतील रहिवासी पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
===Photopath===
130521\img-20210512-wa0016.jpg
===Caption===
म्हाडा इमारत टँकरने पाणीपुरवठा