शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 9:36 PM

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे श्रावणसरींची प्रतीक्षा : पाण्याअभावी शेतकरी चिंतित

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.कमी पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदा उळे टाकून रोपे तयार करून ठेवली आहेत; मात्र लागवडीसाठी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. याआधीच खरिपातील अन्य पिके पावसाअभावी सुकली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे. हा आर्थिक फटका सहन करत असतानाच येथील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असणाºया कांदा पिकाचे भवितव्य श्रावण महिन्याच्या सरींवर अवलंबून आहे. परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या भरवशावर काही शेतकºयांनी कांदा लागवड सुरू केली आहे. या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीस सुरु वात होईल, अशी आशा आहे.पिके सुकेल्याने व फुलोºयात झटका बसून अपेक्षित उत्पादन न होता घट येणार आहे. या परिसरात दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला लवकरच कांदा लागवड करतात. यावेळी पाऊस पाणीच नसल्याने लागवड उशिरा होणार आहे. मात्र त्याकरिता पुढे होणाºया पावसावर गणित अवलंबून राहणार आहेच. परिसरात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने विहिरींना पाणी नाही. नदी, नाले, बंधारे, शेततळे, कूपनलिका कोरड्याठाक आहेत. काही शेतकºयांना आपल्याकडे साठवणूक केलेल्या पाण्यावर तर काहींनी निसर्गभरोसे रोपे जगविली आहेत. पंचेचाळीस दिवसांपूर्वी टाकलेली रोपे लागवड योग्य तयार झाली आहे. काहींना थोडेसुद्धा पाणी नसल्याने ती जळाली. आज न उद्या पाऊस येईल या आशेने शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी शेत मशागत करून पाळे पाडून वाफे तयार करून ठेवली आहेत. श्रावणात रिमझिम पाहळे स्वरूपात जरी पाऊस पडत राहिला तरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड कोरडवाहू स्वरुपात होईल आणि त्यानंतर शेतकºयांचे डोळे परतीच्या पावसावर राहतील.