शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

मोसम खोऱ्याला पाणीटंचाईची झळ

By admin | Published: May 13, 2017 12:10 AM

नामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. सुजलाम सुफलाम गावांपैकी एक असलेल्या नामपूर गावात आता पाणीटंचाईची ओरड सातत्याने होत असते. हरणबारी धरणाचे आवर्तन सोडा ही मागणी म्हणजे तात्पुरती मलमपट्टीच असून त्याऐवजी मोसम नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपायांची मागणी नागरिकांनी केली आहे. मोसम नदीवरच ठिकठिकाणी केटीवेअर बांधलेत तर मोसम नदीकाठावरील गावांचा पाणीप्रश्न बऱ्याच प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे. म्हणून मोसम नदीवर केटीवेअर बांधण्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.  हरणबारी धरणाचे आवर्तन येते. मोसम नदीतून ते पाणी वाहून जाते. आठ-पंधरा दिवस पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होते. पुन्हा पाणीप्रश्न तीव्र होतो. मोसम नदीतील वाळू उपसा प्रचंड वेगात आहे. सरकारी अधिकारी, पोलीस यांच्या आशीर्वादामुळे तो कुणीही थांबवू शकत नाही. वाळू संपल्यावर पाणीप्रश्नाची तीव्रता आजपेक्षाही पुढे गंभीर होईल. हरणबारीचे शेवटचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दगाजी बच्छाव, अशोक सावंत, किरण सावंत, रूपेश शहा, संभाजी सावंत यांनी केली आहे़हरणबारी उजवा व डावा कालवा हे प्रलंबित प्रश्न आहेत. या दृष्टीने डावा व उजव्या कालव्यातून कायमस्वरूपी पाणी खेळते झाले तर मोसम खोऱ्याचा पाणीप्रश्न सुटून मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. मोसमचे पूर पाणी जर तळवाडे टॅँकमधून टाकले तर या पाण्याचा फायदा शेती सिंचनाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तळवाडे टँक जर पूरपाण्याने भरून घेतला तर टेंभे, तळवाडे, खामलोण, नामपूर शिवार, मोराणे व बिजोरसे या भागातल्या विहिरींना याचा फायदा होणार आहे. तळवाडे टँकमध्ये जाणाऱ्या चाऱ्यांचे काम जलद गतीने व समजदारीने करून घेतल्यास मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.नामपूरला पाणीप्रश्नाची तीव्रता कमी व्हावी म्हणून मोठ्या महादेवाच्या मंदिरालगत एक केटी वेअर बांधल्यास पाणीपुरवठा तर सुरळीत होईलच मात्र गावातले बोअर (जलपरी) व्यवस्थित सुरू राहतील. इंदिरानगरजवळील बंधाऱ्याची उंची वाढवल्यास येथे जलसंचय झाल्यास आजूबाजूच्या विहिरींचाही पाणीसाठा टिकून राहील म्हणून उपाय करणे गरजेचे आहे. हरणबारी धरण बांधून बरेच दिवस झालेत. धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. या गाळामुळे धरणातील साठवण क्षमताही कमी झाली आहे.