गोरख घुसळे पाटोदादुष्काळ हे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना लागलेले ग्रहणच. तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असल्याने सर्वच जलस्रोत कोरडेठाक झाले असून, जनावरांच्या चाऱ्याबरोबरच रोजगार व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागला आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलावर्ग व नागरिकांना मैलोन्मैली भटकंती करावी लागत आहे. हाताला रोजगार नाही, पिण्याला पाणी नाही त्यामुळे अनेक मजूर इतरत्र स्थलांतरित होत रोजगार शोधत आहेत. कडक उन्हाळ्याचे अजून तीन महिने बाकी असून, या भयानक संकटाने स्थलांतरितांची संख्या वाढत असल्यामुळे गावे ओस पडू लागली आहेत. या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक खचला आहे. शासनाने स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना करावी, रोजगार हमीची कामे सुरू करावी, शेतकऱ्यांची शेती कर्जे माफ करावीत. वीजबिल माफ करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.येवला तालुक्यातील पालखेडडावा कालवा लाभक्षेत्रातील चार दोन गावे वगळता संपूर्ण तालुक्यात १९७२ च्या भयाण दुष्काळापेक्षाही या वर्षीचा दुष्काळ भयानक असल्याचे जेष्ठ नागरिक सांगत आहे.या वर्षी खरीप आण िरब्बी हे दोन्ही हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.पाण्याबरोबर जनावरांच्या चार्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडल्याने पाणी आणणार कोठून ? चारा पाण्याअभावी शेतकरी आपल्या लाडक्या जनावरांना बाजाराची वाट दाखवीत आहे.मात्र तेथेही जनावरांना कुणी विचारात नसल्याने त्यांना पुन्हा घरी आणून सांभाळावे लागत आहे.संपूर्ण तालुका टंचाईच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी वर्ग लाखो रु पयांचा खर्च करून विहीर खोदाई ,बोअरवेल घेत आहेत.मात्र पाणी लागत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहे.या भागात शेकडो हेक्टर द्राक्ष,डाळिंब,बागा असून त्यांना या दुष्काळाचा सर्वात जास्त फटका बसला आहेपिण्यालाच पाणी नाही तर बागांना पाणी आणायचे कोठून आण ित्या जागवायच्या कशा हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.पाणीच नसल्याने आता या बागा करपू लागल्या आहे.द्राक्ष शेतीला द्राक्ष काढणीनंतर पुढीलवर्षीच्या उत्पादनाकरिता कराव्या लागणार्या खरड छाटणीस पाणी टंचाई निर्माण झाली आहे.अनेक शेतकर्यांनी शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी, पिके उभी करण्यासाठी तसेच सिंचन सुविधा करण्यासाठी शेतकर्यांनी राष्ट्रीयकृत बँका,पतसंस्था ,व सहकारी सोसायट्या यांच्याकडून लाखो रु पयांचे कर्ज घेतले मात्र गेल्या तीन वर्षापासून लागोपाठ दुष्काळाच पडत असल्याने शेतातील उत्पन्नावर परिणाम झाल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणति पूर्णपणे कोलमडून पडले असून हे कर्ज कसे भरावयाचे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सरकार फक्त घोषणा करते.वीजिबल शेती कर्ज माफ होण्याची गरज आहे.कर्ज मुक्तीच्या बाबतीत शासन उदासीन दिसत आहे.शेतकरी जगविण्यासाठी कर्जमुक्ती सारखा निर्णय घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा .-सदाशिव बाबुराव शिंदे.शेतकरीकसे जगावे..... सध्या तालुक्यात शेतमजूर व शेतकर्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे मोलमजुरीवर जीवन जगनार्या मजुरांचे हाल होत आहे.त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न मजुरांना पडला आहे.शासनाने रोजगार हमीची कामे सुरु करून आमच्या हाताला काम द्यावे एवदीच माफक अपेक्षा इब्राहिम पठाण शेतमजूरदुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून शासनाने शेतीसाठी घेतलेले कर्ज व वीजिबल पूर्णपणे माफ करावे.व शेतकर्यांना दिलासा द्यावा गरज असेल अशा ठिकाणी तत्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा झाला पाहिजे पण निर्णय घेतांना शासन विचार करत आहे वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यावा -संजय शेळके, शेतकरी ठाणगाव
येवला तालुक्यातील जलस्रोत कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2016 10:11 PM