लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दहा - बारा दिवसांपासून संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, कळवण आणि देवळा तालुकावगळता अन्य तालुक्यांमध्ये कोसळलेल्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहत असून, १४ प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांवर साठा आहे तर तब्बल १९ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ३९ टक्के पावसाची नोंद नांदगाव तालुक्यात झाली असून, माणिकपुंज, नागासाक्या प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत.जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे काही तालुक्यांमध्ये आता वरुणराजाला थांबण्यासाठी साकडे घातले जात आहे. जिल्ह्यातील नाशिक (१६० टक्के), इगतपुरी (११६ टक्के), दिंडोरी (१२७ टक्के), पेठ (१११ टक्के), त्र्यंबकेश्वर (१४३ टक्के), बागलाण (१०० टक्के), सुरगाणा (११८ टक्के) आणि सिन्नर (१११ टक्के) या तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १०९ टक्के पावसाची नोंद झाली असून, मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाऊस झालेला होता. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.जिल्ह्यातील १४ प्रकल्पांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक झालेला आहे. त्यामुळे त्या त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न जवळपास मिटला आहे. जिल्ह्यातील १९ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यात गंगापूर (५१०४ क्यूसेक), काश्यपी (१०५५), गौतमी गोदावरी (५७०), आळंदी (९६१), पालखेड (११७८८), करंजवण (४०३०), वाघाड (१९९५), पुणेगाव (२६८), दारणा (५३६०), भावली (२९०), मुकणे (५००), वालदेवी (१३०५), कडवा (७७६), नांदूरमधमेश्वर (३६,१४२), भोजापूर (९९०), चणकापूर (५५८६), हरणबारी (२५८४), केळझर (८३९), पुनंद (१३४२) याप्रमाणे विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत वाढला आहे. त्यात प्रामुख्याने, पालखेडमध्ये मागील वर्षी २७ टक्के साठा होता. यंदा तो ७० टक्क्यांवर गेलाआहे. ओझरखेड येथील साठाही मागील वर्षी ५० टक्के होता तो ८३ टक्के झाला आहे. तिसगाव येथील साठा मागील वर्षी १९ टक्के होता यंदा त्यात लक्षणीय वाढ होत तो ६३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने समाधान व्यक्त केले जात असून, प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नागासाक्या, माणिकपुंज शून्यचजिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पावसाने टक्केवारीची शंभरी गाठलेली असताना नांदगाव, चांदवड, कळवण आणि देवळा तालुक्यांतील पर्जन्यमानाची स्थिती कठीण बनलेली आहे. नांदगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नागासाक्या व माणिकपुंज या प्रकल्पात एक थेंबही पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे नांदगावची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यापाठोपाठ देवळा तालुक्यात ४५ टक्के, कळवण तालुक्यात ५६ टक्के, तर चांदवड तालुक्यात ६१ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. येवला तालुक्यातील काही भागात वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली असली तरी राजापूर, नस्तनपूर परिसरातील धरती अद्यापही तहानलेलीच आहे.पावसाने सरासरी ओलांडलीजिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १०१३ मिमी. इतकी आहे; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सरसरी ११०९ मिमी. इतका पाऊस कोसळला असून, दोन दिवसांपूर्वीच पावसाने सरासरी ओलांडली आहे. गोदावरीत गेल्या चार दिवसांपासून सातत्याने विसर्ग सुरू असून, पूरस्थितीमुळे गोदाकाठ परिसरातील जनजीवन कोलमडून पडले आहे. अनेकांच्या शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने जमिनीचा कस बिघडण्याबरोबरच पिकांनाही धोका उत्पन्न झाला आहे.
जिल्ह्यात धरणांत ७९ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 10:52 PM
नाशिक : गेल्या दहा - बारा दिवसांपासून संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५९ टक्के पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, कळवण आणि देवळा तालुकावगळता अन्य तालुक्यांमध्ये कोसळलेल्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहत असून, १४ प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांवर साठा आहे तर तब्बल १९ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
ठळक मुद्दे१९ प्रकल्पांतून विसर्ग : १४ प्रकल्पांमध्ये ९० टक्क्यांवर साठा; नांदगाव तालुक्याची स्थिती गंभीर, अनेक ठिकाणी पिकांना धोका