सटाणा : शहरात गेल्या तीन आठवड्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे एकूण २० टँकरने शहरात पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी चणकापूर, पुनंद व केळझर या धरणातून आवर्तन आल्यानंतरच नळांना मुबलक पाणी येते; परंतु नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे ६ मार्च रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती; मात्र आवर्तन न सोडल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. यावर नगराध्यक्षांनी नगरसेवकांची बैठक घेऊन शहरात टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे स्पष्ट केले.शहराला कायमस्वरूपी पाण्याचे नियोजन व्हावे यासाठी पुनंद पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली असून, लवकरच हा प्रश्न सुटेल असा आशावादही नगराध्यक्ष मोरे यांनी शेवटी व्यक्त केला.
सटाणा शहरात पालिकेतर्फे २० टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:13 AM