नाशिकरोड : जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर सोसायटीच्या पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला असून, ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक लोकांना पिण्यापुरतेही पाणी मिळाले नाही. सोसायटीच्या सामान्य सभासदांना पुरेसे पाणी मिळत नाही.गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वारंवार तक्र ारी करूनही संचालक मंडळ आणि कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. महापालिकेकडून कमी पाणी मिळते, पंप नादुरु स्त झाला आहे, वीजपुरवठा खंडित झाला अशी कारणे दिली जात आहे. आषाढी एकादशी असूनही नागरिकांना पाणी मिळाले नाही, आदल्या दिवशीही पाणी मिळाले नव्हते. त्यामुळे नागरिकांना कोरोना संक्रमणात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.शेजारच्या सोसायट्या आणि कॉलन्यांमधून गरजेपुरते पाणी नागरिकांना आणावे लागत आहे. पाणीच मिळत नसल्याने थकबाकी वाढत चालली आहे. पाणी रिकनेक्शन मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास चेअरमन रितेश गांगुर्डे यांनी व्यक्त केला आहे.
नारायणबापूनगरमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:38 PM