दिंडोरी : तालुक्यातील जानोरी, मोहाडी, जऊळके दिंडोरी व निफाड तालुक्यातील ओझर या गावांना जोडणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने चारही गावांना होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेतून ओझरसह तालुक्यातील चार गावांना पालखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो, या योजनेची मुख्य पाइपलाइन चार दिवसांपूर्वी एका खासगी पाइपलाइनच्या कामामुळे फुटली, त्यामुळे ओझर शहरास जानोरी, मोहाडी, जऊळके दिंडोरी, या गावांना होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून ठप्प झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सदर पाइपलाइनचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, चार दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला यश आलेले नाही, यामुळे या गावातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मुख्य जलवाहिनीचे काम त्वरित दुरुस्त करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
फोटो - २२ मोहाडी वॉटर
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती.
===Photopath===
220221\22nsk_33_22022021_13.jpg
===Caption===
फोटो - २२ मोहाडी वॉटर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती.