एकलहरे : येथील एकलहरेगाव व मळे परिसरात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या वीज मोटारीची केबल चोरीस गेल्याने दोन दिवस रहिवाशांना पाण्याविना हाल काढावे लागले. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.एकलहरे ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरीच्या काठावर सार्वजनिक विहीर खोदून तेथे इलेक्ट्रिक मोटार बसवून गावाला पाणीपुरवठा केला जातो. या विहिरीवरील सुमारे २५० मीटर केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हालझाले.याबाबत पाणीपुरवठा कर्मचारी शिवाजी संजय गांगवे व शिपाई नितीन श्यामराव राजोळे हे १८ मार्च रोजी सकाळी पाणीपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी गेले असता तेथील कॉपर केबल मोटारीपासून कट करून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांना आढळले.त्यांनी ही बाब सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना सांगितली. तशी लेखी तक्रार ग्रामपंचायतीस दिली. या आधीही अशा प्रकारची चोरी दोन-तीन वेळा झाल्याचे नमूद केले. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीने नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याआधीही दोन-तीन वेळा केबल चोरीस गेली असून, मुद्दाम गावकरी व ग्रामपंचायतीला त्रास देण्यासाठी केबल चोरी करणे, पाणीपुरवठा करणारे नळ तोडणे, इलेक्ट्रिकल पोलवरील बल्ब फोडणे हे प्रकार घडत असल्याचा संशय ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ यांनी व्यक्त केला आहे. या चोरट्याचा पोलिसांनी शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
केबल चोरीला गेल्याने पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:23 PM
एकलहरेगाव व मळे परिसरात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या वीज मोटारीची केबल चोरीस गेल्याने दोन दिवस रहिवाशांना पाण्याविना हाल काढावे लागले. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देपोलिसांत तक्रार दोन दिवस गावकरी पाण्याविना