इंदिरानगर : महापालिका प्रभाग ३० मधील शिवकॉलनी परिसरातील ऐन पावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर झाल्याने संतप्त नगरसेवक आणि रहिवाशांनी अधिकाºयांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास राजीव गांधी भवनसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.प्रभाग ३० मधील ऐन पावसाळ्यातही पाणीप्रश्न भेडसावत असून, शिवकॉलनीमधील ओम साई अपार्टमेंटसह परिसरातील सुमारे सहा ते सात अपार्टमेंटमध्ये सुमारे शंभर ते दीडशे नागरिक वास्तव्यास आहेत. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दहा ते पंधरा मिनिटे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम भरले जात नाही, तर वापरण्याचे पाणी आणायचे कुठून? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होतच नसल्याने प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे व श्याम बडोदे हे शुक्रवारी मनपा आयुक्तांना रहिवाशांसह भेटण्यास गेले, परंतु आयुक्त काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे भाजपाच्या गटनेत्यांच्या कार्यालयात पाणीपुरवठा अधिकाºयांशी चर्चा केली असता, त्यानुसार दुपारी साडेतीन वाजता पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नरवाडे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण, के. पी. चव्हाण, रवींद्र धारणकर, दत्तात्रय घुगे आदींनी शिवकॉलनी परिसरात पाहणी केली असता, नगरसेवक श्याम बडोदे यांच्यासह महिला व नागरिकांनी घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला.दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सरोजनी शुक्ला, श्रद्धा जोशी, प्रतिभा गांगुर्डे आदी नागरिकांनी दिला.
पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:47 PM
इंदिरानगर : महापालिका प्रभाग ३० मधील शिवकॉलनी परिसरातील ऐन पावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर झाल्याने संतप्त नगरसेवक आणि रहिवाशांनी अधिकाºयांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास राजीव गांधी भवनसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.
ठळक मुद्देअपुरा पुरवठा : प्रभाग ३०मधील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा