मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवण नगरपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेस नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यतेचे पत्र आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांच्याकडे सुपुर्द केले. कळवण शहरातील १७ प्रभागांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडणारी ही योजना चणकापूर प्रकल्पस्थळावरून नियोजित असून, १९ किमी लांबीची गुरुत्वाकर्षणावर चालणारी आहे.
आमदार नितीन पवार, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांनी शासनस्तरावर मागणी करत पाणीपुरवठा योजनेच्या या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवल्याने लवकरात लवकर या कामाला सुरुवात होणार असून, कळवण शहराची तहान भागणार आहे.
कळवण शहरात पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित होणार असल्यामुळे विजेची पूर्ण बचत होणार आहे. दरमहा असलेला लाइट बिलाचा भार कमी होणार असून, सौरऊर्जेवर कार्यान्वित होणारी ही पथदर्शी अशी जिल्ह्यातील पहिलीच पाणीपुरवठा योजना ठरणार आहे.
इन्फो
पाणी आरक्षणात वाढ
कळवण शहरासाठी पूर्वी ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित होते. आता त्यात १.३९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण वाढविण्यात आल्यामुळे शहरासाठी २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित झाले आहे. सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना ही ४० लिटर प्रतिव्यक्ती असून, नवीन पाणीपुरवठा योजना १३० लिटर प्रतिव्यक्तीने मंजूर झाली आहे. पूर्वीचे जलकुंभ हे ५.२५ लाख लिटर क्षमतेचे असून, नवीन योजनेत १७.६५ लाख लिटर क्षमतेचे शिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर येथे ३ नवीन जलकुंभ होणार आहेत. जुन्या जलशुद्धीकरण केंद्राबरोबर या योजनेत संभाजीनगरमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करण्यात आल्यामुळे कळवणकर जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वातील योजना २० किमी लांबीची असून, नवीन योजना १७ प्रभागांत पाणीपुरवठा करणार आहे. तिची लांबी ३८ किमी असणार आहे.
कोट...
कळवण शहराच्या वाढत्या विस्तारामुळे उपलब्ध योजनेतून कळवण शहराला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती लक्षात घेतली. पुढील २५-३० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून नवीन योजनेच्या प्रस्तावास २५ कोटींच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळवली. ही योजना लवकरच कार्यान्वित होऊन शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.
-नितीन पवार, आमदार
कोट...
कळवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनाचे गिरणा नदीपात्रातील उद्भव उन्हाळ्यात कोरडेठाक पडतात. त्यामुळे चणकापूर प्रकल्प स्थळावरून पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनस्तरावर दाखल होता. आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळविण्यात यश आले
-कौतिक पगार,
गटनेते, कळवण नगरपंचायत
-------
ठळक मुद्दे
२.२५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित
१३० लिटर प्रतिव्यक्ती पाणी मिळणार
१७.६५ लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ
१७ प्रभागात पाणीपुरवठा होणार
३८ किमी योजनेची लांबी
-------------------------------
फोटो - ०२ कळवण वॉटर
कळवण शहर पाणीपुरवठा योजना प्रशासकीय मान्यतेचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वीकारताना आमदार नितीन पवार, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, जयेश पगार आदी.
020921\02nsk_34_02092021_13.jpg
फोटो - ०२ कळवण वॉटर कळवण शहर पाणी पुरवठा योजना प्रशासकीय मान्यतेचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वीकारताना आमदार नितीन पवार, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, जयेश पगार आदी