शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

बागलाण, मालेगाव तालुक्यातील साठ गावांना पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:31 AM

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत बागलाण व मालेगाव तालुक्यातील साठ गावांना सुमारे ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

सटाणा : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत बागलाण व मालेगाव तालुक्यातील साठ गावांना सुमारे ७० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.  मंजूर योजनांमध्ये बागलाणच्या तब्बल ५१ गावांचा समावेश आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत या कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर कालव्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हरणबारी डाव्या कालव्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.  बागलाण व मालेगाव तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या समवेत झालेल्या विशेष बैठकीत बागलाण तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव आपण ठेवला होता. मुख्यमंत्र्यांसह राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेत बागलाण तालुक्यातील ५१ गावांसह मालेगाव तालुक्यातील नऊ गावांचा समावेश केल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत या कामांना सुरु वात होणार असून, लवकरच या सर्व कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.या गावांना होणार फायदाबागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे, अलियाबाद, औंदाणे, आव्हाटी, भाक्षी, भिलवाड, जामनेस पाडा, बिजोटे, बिलपुरी, हनुमंत पाडा, कांद्याचा मळा,बोºहाटे, राहूड, चौंधाणे, दह्याणे, देवठाण, गोराणे, जोरण, कºहे, केळझर, खमताणे, खिरमाणे, मळगाव, भामेर, मुल्हेर, पिंपळदर, पिंपळकोठे, पिंगळवाडे, रामतीर, रातीर, भंडारपाडे, भाटांबा, भिकारसोंडा,भोकरपाडा, धुखीपाडा, ताहाराबाद, तांदूळवाडी, तरसाळी, कोपमल, वीरगाव, वाघळे व मालेगाव तालुक्यातील अस्ताणे, चिंचगव्हाण, ढवळेश्वर, निमशेवडी, पाडळदे, पांढरूण, वडनेर, वºहाणे व वºहाणेपाडा या गावांचा व पाड्यांचा समावेश करण्यात आला.बागलाण, मालेगाव तालुक्यातील जलसिंचन प्रश्नासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. सटाणा शहराचा पाणीप्रश्न, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, हरणबारी डावा कालव्यासह, साक्र ी-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि तब्बल ५१ गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात आपल्याला यश आले आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात आपल्याला यश आले आहे.- डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

टॅग्स :Waterपाणी