लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : येथील प्रभाग क्रमांक २६ मधील शिवशक्ती चौक परिसरात मध्यरात्री पाणीपुरवठा होत असून, तोही अत्यंत कमी दाबाने होत असल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची झोप उडाली असून, आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तरी मनपाने याबाबत त्वरित दखल घेत पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याबरोबरच सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.महापालिका सिडको पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे आजही काही भागात कमी दाबाने तर काही भागात मात्र मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र बघावयास मिळते. मनपाच्या संबंधित विभागाने याबाबत त्वरित दखल घेऊन मध्यरात्री होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याबरोबरच पाणीपुरवठा सुरळीत करावी, अशी मागणी ललिता पगारे, पुष्पावती बच्छाव, सुनीता खानदळे, माया अहिरे, कविता निकम, रुपाली कोठावदे, शालिनी बोरसे, आशा गलांडे, रजनी रत्नाकर आदिंनी केली आहे.लोकप्रतिनिधी फिरकत नसल्याने संताप४निवडणूक काळात सर्वच राजकीय पुढाऱ्यांकडून प्रभागाचा विकास करण्याचे आश्वासन दिले जाते, परंतु निवडणूक झाली की, नगरसेवक फिरकतच नसल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील महिलावर्गाने दिली. पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांनी लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे. नगरसेवकांकडून साधे मूलभूत प्रश्न सुटत नसून त्यांना मिळणारा निधी जातो कुठे, असेही महिलांनी बोलून दाखविले.कमी दाबाने पाणीपुरवठा४पाथर्डी फाटा येथील निसर्ग कॉलनी शनिमंदिर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेवक व मनपा अधिकाऱ्यांना कळवूनही दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाणीपुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशाराही महिलावर्गाने दिला आहे.
शिवशक्ती चौकात मध्यरात्री पाणीपुरवठा
By admin | Published: May 16, 2017 12:23 AM