पाणीटंचाई असलेल्या हिरापूर, बोपाणे, कळमदरे, परसूल, उसवाड, नांदुरटेक, देवरगाव, भोयेगाव, जोपूळ या नऊ गावांना तर हिरापूरची धनगरवाडी, तळेगाव रोहीची दत्तवाडी, बजरंगनगर, घुमरे वस्ती, काजीसांगवीची दुर्गानगर, नांदुरटेकची चिंचबारी, शिंगवेचे झाल्टे व मढे वस्ती, रामवाडी, खताळ वस्ती, शिंदे व खताळ वस्ती, भाटगावची माळीवस्ती या दहा वाड्यांना टँकरच्या दोन खेपा तर काही गावांना टँकरची एक खेप तसेच काही गावानां दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले. दोन वर्षापूर्र्वी जून ते जुलै महिन्यापर्यंत या भागात पाणीटंचाई असल्याने टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा पाणीटंचाई भीषण असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.