नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध्ये ६७ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक ४० गावे आणि २४ वाड्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्णातील अनेक गावांमध्ये पाण्याची बिकट परिस्थिती असल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये टॅँकर्स सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना शासकीय आणि खासगी टॅँकर्सच्या माध्यमातून पाणीपुवठा केला जात आहे. येवला तालुक्यातील ४० गावे आणि २४ वाड्या अशा एकूण ६४ गावांना २३ टॅँकर्सद्वारे पाणीुपरवठा करण्यात येत आहे. येवल्याबरोबरच बागलाणमध्ये १९ गावे आणि एका वाडीवस्तीवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मालेगावमध्येदेखील पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने येथील सात गावांना आणि २२ वाड्यांना २९ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. नांदगावमध्येदेखील ५ गावे आणि ४८ वाड्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यांमध्येदेखील अनेक ठिकाणी टॅँकर्स सुरू आहेत.सिन्नरमध्ये १० गावे आणि १८ वाड्यांमध्ये टॅँकर्सने पाणीपुरवठा होत असल्याने तेथी रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्णातील दुष्काळी तालुक्यांमधून अलीकडे टॅँकर्सची मागणी वाढली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे टॅँकर्सची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीदेखील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन आलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून टॅँकर्स उपलब्ध करून करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याने अनेक ठिकाणी वेळीच टॅँकर्स उपलब्ध झाले आहेत.जिल्ह्णात २६ शासकीय आणि ४१ खासगी टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचे काम सुरू असून टॅँकर्सची मागणीही वाढतच आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्याच्या गंभीर प्रश्न आहे. सद्य:स्थितीत ३३ विहिरींमधून गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर नऊ विहिरी टॅँकर्स भरण्यासाठी अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत. टॅँकरच्या मंजूर फेºया आणि प्रत्यक्षातील फेºयांवर नियंत्रण ठेवून गाव, वाड्यांना होणाºया पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
जिल्ह्णात २३० गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:05 AM
नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध्ये ६७ टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक ४० गावे आणि २४ वाड्यांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे६७ टॅँकर्स सुरू : येवला तालुक्यात सर्वाधिक गावांचा समावेश