सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील वाडी-वस्त्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असून, ग्रामपंचायत व शासनाच्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सहा महिन्यांपासून वाडी-वस्त्यांवरील नागरिकांची तहान टँकरवर भागविली जात आहे. नियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे गावाचा समावेश आहे. त्यामुळे गावात व काही वस्त्यांवर दिवसाआड नळ पाणीपुरवठा होत आहे. परंतु काही ठिकाणी पाणीयोजनेचे पाणी न गेल्याने दरवर्षी तेथे उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाई जाणवते. गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळी स्थिती असल्याने वाडी-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाझर तलाव, केटीवेअर बंधारे, सार्वजनिक विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे वाडी-वस्त्यांवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता गंभीर होत आहे. येथील वाडी-वस्त्यांवरील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाकडून दोन टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु दिवसेंदिवस खालवत चाललेली पाणी पातळी, बाष्पीभवन, वाढती लोकसंख्या अशा अनेक कारणांमुळे शासनाने मंजूर केलेले टॅँकरचे पाणी कमी पडत होते. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. सुमारे चार वर्षांपूर्वी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीने स्वखर्चातून चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ट्रॅक्टर व पाण्याचा टॅँकर विकत घेतला. पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त भागात ग्रामपंचायत खर्चातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून वाडी-वस्त्यांवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येथील चकोर वस्ती, माकडे वस्ती, कोलधाडवाडी, खारे वस्ती, गर्जे वस्ती, वाळकेवस्ती, दौंड वस्ती, शेळके वस्ती, कांगणे वस्ती तसेच चासरोड, मानोरी रोड, बर्के रोड, बोडके वस्ती, नागरे वस्ती, सानपवस्ती आदी भागातील तसेच काही ठिकाणी मागणीनुसार दररोज टॅँकरच्या ७ ते ८ खेपांनी पाणी पुरवले जात आहे. गावाला दिवसाआड पाणीपुरवठाकणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावरच सदरची योजना अवलंबून आहे. धरणाने तळ गाठला असून, मृत साठ्यावरच गेल्या महिन्यापासून योजना तग धरून आहे.नांदूरशिंगोटे व परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी व चाºयाच्या तीव्र टंचाईमुळे पशुधनावर उपासमारीची वेळ आली आहे. वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.दिवसेंदिवस गावाचा विस्तार वाढत असल्याने आगामी काळात पाणी नियोजन करणे महत्त्वाचे आहेत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे गावातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व पाणी काटकसरीने वापरावे.- गोपाल शेळके,सरपंच, नांदूरशिंगोटेमागणी असेल त्या भागात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नित्यनियमाने दिवसभर वाड्या-वस्त्यांवर पाणी वाटप केले जाते. त्यामुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती काही प्रमाणात कमी झाली आहे. एकलव्यनगर येथे व आगिवले वस्ती येथे टॅँकर पुरविला जात आहे.- अनिल शेळके,उपरपंच, नांदूरशिंगोटे
शासनाकडून टॅँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:01 AM
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील वाडी-वस्त्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असून, ग्रामपंचायत व शासनाच्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सहा महिन्यांपासून वाडी-वस्त्यांवरील नागरिकांची तहान टँकरवर भागविली जात आहे. नियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठळक मुद्देगावात व काही वस्त्यांवर दिवसाआड नळ पाणीपुरवठा टंचाईची धग : पाणी-चाराटंचाईमुळे जनावरांवर उपासमारीची वेळ; विंहिरींनी गाठला तळ