नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या नामांकित संस्थेच्या सदस्यांनी त्र्यंबकेश्वर रांगेतील इतिहासकालीन रांजणगिरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवित वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था केली.
येथील शिवकालीन इतिहास लाभलेला परिसर तसेच शिवकालीन मुख्य दरवाजाजवळील परिसर स्वच्छ करीत त्याचप्रमाणे शिवकालीन असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या. वन्यजीवांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबवली असून परिसर उजळून टाकला. संस्थेच्यावतीने स्वच्छता मोहीम त्र्यंबकेश्वरजवळील रांजणगिरी किल्ला येथे पार पडली. त्र्यंबकेश्वर रांगेतील रांजणगिरी हा किल्ला समुद्र सपाटीपासून २७२९ फूट उंच असून नाशिक शहर हे प्राचीन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. यावेळी किल्ल्यावरील काही ठिकाणचा रस्ता घसरगुंडीसारखा असल्यामुळे टिकाव, फावडे यांच्या सहाय्याने पायऱ्या करण्यात आल्या. त्यानंतर किल्ल्यावर दोन पाण्याच्या टाक्या आहेत, त्यात खूप मोठ्या प्रमाणात दगडगोटे, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या आदी प्रकारचा कचरा गोळा करीत स्वच्छता करण्यात आली. यानंतर मोठमोठे दगड हातोडा व पाहरीच्या सहाय्याने फोडून वरती काढण्यात आले. त्यानंतर पाण्याच्या टाकीतील तळाला असलेला मोठा गाळ व माती काढण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत सर्व सदस्यांनी मिळून कमीत कमी दोन ते अडीच ट्रॅक्टर माती व दगड बाहेर काढल्यामुळे पावसाळ्यामध्ये टाकीमध्ये जास्तीत जास्त पाणी साचून वन्यजीवांना त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. तसेच शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती संस्थेकडून लावण्यात आलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी टाक्यातल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येईल.
या मोहिमेत श्याम गव्हाणे, सोमनाथ विजय महाले, राम दाते, किसन थोरात, गणेश कातोरे, शेखर चव्हाण या मावळ्यांनी अथक परिश्रम घेतले.
------------------
शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती संस्थेच्यावतीने रांजणगिरी किल्ल्यावर शिवकालीन पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करताना बाळासाहेब शिंदे, सोमनाथ गव्हाणे, पुरुषोत्तम रहाडे व इतर सदस्य. (२६ नांदूरवैद्य १)
===Photopath===
260521\26nsk_14_26052021_13.jpg
===Caption===
२६ नांदूरवैद्य १