भगूर : महात्मा गांधी रोडवरील संताजी मंगल कार्यालया समोरील पिण्याच्या पाण्याची टाकीची अत्यंत दुरावस्था झाली असून त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.संताजी मंगल कार्यालयाजवळील पिण्याच्या पाण्याच्या टाकी भर लोकवस्तीत असून टाकीच्या जवळुनच विद्यार्थी, कामगार, नागरिक, महिला यांची सतत वर्दळ असते. पाण्याच्या टाकीचे सिमेंटचे काही ठिकाणचे स्लॅब कोसळले असून तिची धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. टाकीजवळूनच वाहणारे गटारीचे सांडपाणी हे त्या पाण्याच्या टाकीच्या शुद्धीकरण केंद्रात जाऊन मिसळते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गटारीतील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रात जाणार नाही व दुरावस्था झालेल्या धोकेदायक टाकीची नगरपालिकेने त्वरित सुधारणा करावी अशी मागणी मनविसेने केली आहे. निवेदनावर सुमीत चव्हाण, शाम देशमुख, नितीन काळे, गजानन आंधळे, विलास हासे, यश राजपुत, अभिषेक चव्हाण, पंकज कापसे, राकेश शितगुडे, राहुल चव्हाण, शरद बलकवडे आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
पाण्याची टाकी धोकादायक
By admin | Published: December 23, 2015 11:04 PM